डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली; मनिषा खत्री या नवीन जिल्हाधिकारी

डॉ. राजेंद्र भारूड यांच्या कार्याचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले होते.
डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली; मनिषा खत्री या नवीन जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली; मनिषा खत्री या नवीन जिल्हाधिकारीSaam Tv

नंदुरबार - धुळे Dhule जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे येथील मुळगावचे डॉक्टर राजेंद्र भारूड Rajendra Bharud यांनी नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात पाचवी ते दहावी शिक्षण घेऊन पुढे डॉक्टर व आयएस झालेले आदिवासी कलेक्टर नंदुरबार आदिवासी जिल्ह्याला लाभले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली.

हे देखील पहा -

विशेष म्हणजे कोरोना काळात प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारुन ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करून रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल नंदुरबार पॅटर्नची देशभरात चर्चा झाली.

डॉ. राजेंद्र भारूड यांच्या कार्याचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले होते. नंदुरबार कलेक्टर म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र भारूड यांची पुणे येथे आदिवासी विकास विभागातील प्रशिक्षण व संशोधन संस्थेत आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून मनिषा खत्री Manisha Khatri या नवीन कलेक्टरचा पदभार सांभाळणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली; मनिषा खत्री या नवीन जिल्हाधिकारी
धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांची बदली

आदिवासी जिल्ह्याला लाभलेले एक आदिवासी कलेक्टर संयमी, शिस्तबद्ध, अभ्यासू व कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख राहिली. डॉ. राजेंद्र भारूड आणखी काही काळ जिल्हाधिकारी म्हणून राहिले पाहिजे होती अशी सर्वसामान्य नागरिकांकडून इच्छा व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com