बीडमध्ये कोट्यावधींचा खर्च करुनही कुपोषित बालकांची संख्या चिंताजनक

बीड जिल्ह्यात ग्रामीणसह शहरी भागात सापडली 276 तीव्र कुपोषित बालके
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषणाच्या समस्यांने डोकं वर काढल आहे. ऊसतोड मजूर, अशिक्षित आणि आजारपणा यामुळे कुपोषणाचे रुग्ण वाढत असल्याचे बालरोग तज्ञांनी सांगितले असून बीड (Beed) जिल्ह्यात मागच्या महिन्यात, तब्बल 276 तीव्र कुपोषित मुले आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा .सर्व विद्यार्थी सुदृढ व्हावेत, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (State Government) विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर कोट्यावधीचा खर्च करते. तरी आजही कुपोषणाची समस्या जिल्ह्यात कायम का? असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे.

ऊसतोड मजुराच्या मागास बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषणाच्या समस्येने डोकं वर काढलं आहे. जुन 2022 अखेर जिल्ह्यात 5 वर्ष वयोगटापर्यंती, तब्बल 276 बालके तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. यात ग्रामीण भागातील 249 तर बीड नगरी प्रकल्पांअंतर्गत 27 बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. या कुपोषित बालकावर जिल्हा रुग्णालयातील कुपोषण मुक्तीसाठीच्या एनआरसी वार्डामध्ये मोफत उपचार केले जात आहेत. कुपोषण मुक्तीसाठी कोट्यावधीचा खर्च केला जात असताना बीड जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर का होतेय ? या प्रश्नांचे उत्तर मात्र प्रशासनाकडे नाही.

हे देखील पाहा -

तर याविषयी कुपोषण मुक्तीसाठी काम करणारे, सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे म्हणाले, की बीड जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. याला शासकीय यंत्रणा जबाबदार आहेत.पोषण आहारासाठी जे तेल दिले जाते ते शासनाने कमी केले आहे. अंगणवाडी स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे वेतनही वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप, कुपोषण मुक्तीसाठी काम करणारे तत्त्वशील कांबळे यांनी केला आहे.

कोरोनाच्या नंतर कुपोषणाचे काही प्रकार प्रशासनाच्या नजरेस आलेले आहेत. ऊसतोड मजूरांची मुले, पालावर राहणाऱ्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळत आहे. शासन कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे. त्याला समाजाने देखील सहकार्य करावे. असे जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी सांगितले.

बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. म्हणून अनेक चिमुकल्यांचे आई-वडील ऊस तोडीला जातात आणि मूलं आजी- आजोबाकडे राहते. त्यामुळं त्यांना पुरेसा सकस आहार मिळत नाही. अशिक्षित पणा, काही आजार यामुळे मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे असं बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या क्षीरसागर/हुबेकर सांगितले आहे.

Beed News
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न शिंदे-फडणवीस सरकार सोडवणार का?

बीड जिल्हा रुग्णालयातील कुपोषण मुक्तीच्या वार्डात मागील महिन्यामध्ये 19 मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या कुपोषण मुक्ती वार्डाचा लाभ घ्यावा. असे आवाहन बालरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ संध्या क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच कुपोषण मुक्ती साठी वार्डात ऍडमिट झालेल्या मुलाच्या आईला, बुडीत मजुरी म्हणून तीनशे रुपये प्रति दिवस दिले जातात असे त्यांनी सांगितले.

तर याविषयी बालकल्याण प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर केकान म्हणाले, की बीड जिल्ह्यामध्ये तीव्र कुपोषित 276 बालके आढळून आले आहेत. बालकाचे वय, वजन, उंची यानुसार बालकांच तपासणी करून तीव्र कुपोषित बालकांची निवड केली जाते. पावसाळा सुरू झाल्यामुळे किरकोळ स्वरूपाचे आजार बळवल्यामुळे, बालकाचे वजन कमी होते आणि तो तीव्र कुपोषित गटात येतात. आतापर्यंत बंद असलेल्या अंगणवाड्या सुरू झाल्या आहेत.

त्यामुळे लाभार्थींना गरम ताजा आहार हा अंगणवाडीतच मिळणार आहे .त्यामुळं लवकरच तीव्र कुपोषित बालकांचा आकडा कमी होईल असं महिला बालकल्याणचे प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी सांगितलं. दरम्यान बीड जिल्ह्यातील वाढत्या कुपोषणाच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा असाच आकडा पुढे राहिला तर बीड जिल्ह्यात मेळघाट सारखे समस्या निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com