शटल सेवेच्या माध्यमातून माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार

मागच्या वर्षी आणि दुसऱ्या लाटे दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे ही शटल सेवा पर्यटकांअभावी बंद होती नाममात्र एक फेरी उपलब्ध होती.
शटल सेवेच्या माध्यमातून माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार
शटल सेवेच्या माध्यमातून माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणारSaam Tv

माथेरान पर्यटनावर आधारित असलेल्या स्थानिकांची जीवनवाहिनी असलेली मिनिट्रेन पावसाळ्यात चार महिने नेरळ ते माथेरान दरम्यान ही सेवा बंद करण्यात येते. मागच्या काही वर्षांपासून इथे अमन लॉज ते माथेरान स्टेशन या तीन किलोमीटरच्या अंतरासाठी शटल सेवा उपलब्ध असते. मागच्या वर्षी आणि दुसऱ्या लाटे दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे ही शटल सेवा पर्यटकांअभावी बंद होती नाममात्र एक फेरी उपलब्ध होती.

त्यामुळे लॉकडाऊन नंतर ह्या शटल सेवेतील फेऱ्यात वाढ होणे गरजेचे होते याठिकाणी सर्वसामान्य नागरिक त्याचप्रमाणे लहान मोठे हॉटेल व्यावसायिक यांचे जीवनमान येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते. नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोयल यांच्याशी पत्रव्यवहार करून शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ करण्याबाबत निवेदन दिले केले होते.

रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोयल यांच्याशी पत्रव्यवहार तसेच फोनद्वारे संभाषण करून माथेरान करांचीही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे सूचित केले होते. अखेर नगराध्यक्ष यांना प्रतिसाद मिळाला, त्यानुसार सोमवार ते शुक्रवार चार चार फेऱ्या आणि शनिवार रविवारी सहा सहा फेऱ्या करण्यात येणार आला आहे. आणि जसजसे पर्यटन वाढेल त्याप्रमाणे ह्या फेऱ्यात आणखीन वाढ करण्यात येईल, शटल सेवेच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com