आरोपींना पकडायला गेले अन् मटणाची पार्टी करुन आले; पोलिसांचा Video व्हायरल

'हा तर किरकोळ विषय आहे, तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे स्व:ता उडविली आहेत'; व्हायरल Video मध्ये पोलिसांचं खळबळजनक वक्तव्य
Pavani Police
Pavani Policeअभिजित घोरमारे

भंडारा : भंडाऱ्यात उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्यां पवनी पोलिसांनी (Pawani Police) आरोपी सोबतच मटण पार्टी केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. हा Video दाखवत पोलिस आणि वाळू माफ़ियांचे संबध किती सुमधुर असल्याची आरोप नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पवनी पोलीस कसे पकडतील? असा प्रश्न उपस्थित करत अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची स्थानिक आमदारांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे पार्टी करतांना त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे संभाषण मोठा धक्कादायक खूलासा करीत आहे. "हा तर किरकोळ विषय आहे, तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे स्व:ता उडविली आहेत" असा धक्कादायक वक्त्वव्य पवनी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याच्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओने आता पोलीस विभागात खळबळ माजली आहे.

Pavani Police
बनावाट दारुसाठी वापरणाऱ्या मद्यार्काचा दीड कोटींचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

काल पहाटे ३.३० च्या दरम्यान भंडारा (Bhandara) उपविभागीय अधिकारी यांना २० ते २५ वाळू माफियांना हल्ला चढवत त्यांच्या गाडीचे काचा फोडल्या व उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा मारहाण झाली होती. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी पवनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी एक पथक रवाना केले होते. या पथकाला आरोपी सापडला त्याला पकडून आणण्यापेक्षा पोलिसांनी त्याच्यासोबत एका हॉटेलमध्ये मटण पार्टी केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असल्याच्या आरोप आमदार महोदयानी केला आहे. विशेष म्हणजे तुमच्या किरकोळ विषय आहे तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे उडविली असा खुलासाच करून या व्हिडीओमध्ये एका पोलिसाने केला असून या पोलिसांना निलंबित करावे अशी मागणी सुद्धा स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com