जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने बुलढाण्यात संपन्न झाली पेन्शन परिषद

1 नोहेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त झालेल्या सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांची भव्य पेन्शन परिषद बुलढाण्यात पार पडली.
जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने बुलढाण्यात संपन्न झाली पेन्शन परिषद
जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने बुलढाण्यात संपन्न झाली पेन्शन परिषदसंजय जाधव

बुलढाणा : 1 नोहेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त झालेल्या सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांची भव्य पेन्शन परिषद बुलढाण्यात पार पडली. यावेळी राज्यभरातून समितीचे असंख्य पदाधिकारी, काँग्रेसच्या प्रदेश सचिव ऍड.जयश्री शेळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील पहा :

गेल्या सहा वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा पेन्शन लागू करा या मागणीसाठी संघर्ष सुरू आहे. 20 जिल्ह्यातून ही पेन्शन संघर्ष यात्रा बुलढाणा जिल्ह्यात पोहोचली. यापुढे विदर्भातील सर्व जिल्ह्यात यात्रा पोहोचणार आहे. राज्य सरकारने येणाऱ्या अधिवेशनात हि मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे.

जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने बुलढाण्यात संपन्न झाली पेन्शन परिषद
रिक्षा उभी करण्यावरून वाद, दोघांना मारहाण; पती-पत्नीवर गुन्हा दाखल!

राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांची मुंबई वरून निघालेली पेन्शन यात्रा बुलढाण्यात पोहोचली. या पेन्शन यात्रेत हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हा राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com