फिर्यादीच निघाला चोर ! सांगलीच्या शेडगेवाडीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश

सांगलीतील शेडगेवाडी येथे आरोपी जयंतीलाल ओसवाल याने घरात चोरी झाल्याचा खोटा बनाव रचला होता. छोट्या भावाला नवीन व्यवसाय सुरु करण्यास पैसे द्यायचे नसल्यामुळे त्याने हे कृत्य केले आहे.
फिर्यादीच निघाला चोर ! सांगलीच्या शेडगेवाडीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश
फिर्यादीच निघाला चोर ! सांगलीच्या शेडगेवाडीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यशविजय पाटील

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटर मध्ये मंगळवारी (दिनांक ६ ) रोजी झालेल्या, सतरा लाख सत्तर हजार रुपयांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात यश कोकरूड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आश्चर्यकारक बाब म्हणजे फिर्यादीच हा आरोपी निघाला असून आरोपीला मुद्दे मालासह अटक करण्यात आली आहे. The plaintiff is a thief! Success of police in detecting theft in Shedgewadi of Sangli

हे देखील पहा -

आरोपी जयंतीलाल रामलाल ओसवाल याचे शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी स्वतःच्या मालकीचे अंबिका स्टील या नावाचे दुकान आहे. तेथून तो सळी, सिमेंट, फरशी, टाईल्स यासह अनेक प्रकारच्या साहित्य विक्री व्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

जयंतीलाल ओसवाल याचा लहान भाऊ प्रकाश देखील त्याच्या कुटुंबासोबतच राहतो. भाऊ प्रकाश यास दुसऱ्या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे मोठा भाऊ जयंतीलाल देणार होता त्यांच्या परिवारामध्ये तसे ठरलेही होते. दरम्यान मंगळवारी सर्व कुटूंबियासह कराडला गेलेल्या जयंतीलाल ओसवाल याने जेवण झाल्यावर घरातुन पैसे चोरी झाल्याचा बनाव केला. आपल्या घरात चोरी झाली असल्याचा गुन्हा त्याने कोकरुड पोलिसात दाखल केला होता.

फिर्यादीच निघाला चोर ! सांगलीच्या शेडगेवाडीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश
शेतकऱ्यांना पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकवण्याचा ठाकरे सरकारचा डाव - पाशा पटेल

याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. दरम्यान श्र्वान पथक ही बोलवण्यात आले होते. मात्र श्र्वान ही घटनास्थळी आसपास घुटमळत होते यामुळे कोकरुड पोलिसांना चोरीचा छडा लावण्याचे आव्हानच होते. मात्र जयंतीलाल यांच्या संशयास्पद वागण्यावरून चौकशी केली असता भावास पैसे द्यायचे नसल्याने मीच सतरा लाख सत्तर हजार रुपये कराड येथील मित्राकडे ठेवल्याचे त्याने सांगितले. यामुळे फिर्यादीनेच हा चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. आरोपीस अटक करून संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com