डॉक्टर तरूणीचा गर्भपात, विवाहित पोलिसाने केला प्रेमाचा घात

डॉक्टर तरूणीचा गर्भपात, विवाहित पोलिसाने केला प्रेमाचा घात
क्राईम लोगो

अहमदनगर ः प्रेमसंबंधातून अनेकदा तरूणींची फसवणूक होते. यात बऱ्याचदा वर्गातील तरूण किंवा कार्यालयातील वरिष्ठ अडकलेले असतात. ही प्रकरणं पोलिस ठाण्यापर्यंत जातात. परंतु एका कायद्याच्या रक्षकानेच तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करून सोडून दिलं. विशेष म्हणजे ही तरूणी डॉक्टरकीचं शिक्षण घेते.

या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरूणीसोबत त्याने प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचंही वचन दिलं होतं. ती तरूणी जेव्हा त्याच्या घरी गेली तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने पोलिस ठाण्यात येत फिर्याद दिली. तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी पोलिस तुळशीराम वायकर फरारी आहे.The police cheated on the young doctor

क्राईम लोगो
खळबळजनक ः एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

या प्रकरणात पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून वायकर याच्यासह आणखी दोन महिलांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शारिरिक अत्याचार करुन जातिवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संगमनेर येथील पोलिस उपाधीक्षक राहुल मदने अधिक तपास करीत आहेत.

पोलिस शिपाई वायकर याचे पाच वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पीडित तरुणीसोबत प्रेमाचे सूत जुळले. तेव्हा दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचंही ठरवलं. आता लग्नच करायचं म्हणल्यावर त्या तरूणीने सर्वस्व अर्पण केलं.

वायकर याने तिच्यासोबत श्रीरामपूर, शिर्डी व बाभळेश्वर अशा विविध ठिकाणी नेले. तेथे शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. तेव्हाही त्या तरूणीच्या वायकरचा कावा लक्षात आला नाही.

पुढे तो लग्नास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे ती तरूणी थेट वायकरच्या घरी गेली. त्यावेळी तेथील कहाणी ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्यासोबत पतीप्रमाणे वागणारा प्रियकर याचे अगोदरच लग्न झालेले आहे.

तिने आपली हकीकत त्याच्या घरी सांगितली. परंतु त्यावेळी तिची वायकरच्या आईने व पत्नीने निर्भत्सना केली. यानंतर तिने पोलिस ठाण्यात येत वरील आशयाची फिर्याद दिली. जातीवाचक शिविगाळ केल्याचेही त्या तरूणीचे म्हणणे आहे.The police cheated on the young doctor

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com