संतापजणक : मैत्रीणीचा नंबर देण्यास नकार दिल्याने पोलिसाने तरुणासोबतच ठेवले शारिरीक संबंध; गुन्हा दाखल

'तुझ्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, (Girlfriend's Mobile Number) तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग; असं हवलदार संबंधीत युवकास म्हणाला..
संतापजणक : मैत्रीणीचा नंबर देण्यास नकार दिल्याने पोलिसाने तरुणासोबतच ठेवले शारिरीक संबंध; गुन्हा दाखल
संतापजणक : मैत्रीणीचा नंबर देण्यास नकार दिल्याने पोलिसाने तरुणासोबतच ठेवले शारिरीक संबंध; गुन्हा दाखलविजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) येथील एका महाविद्यालयीन युवकावर अनेसर्गिक संबंध प्रस्थापित करण्यासह त्या घटनेची क्लिप viral करण्याची धमकी देत खंडणी घेतल्या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा हवलदार हणमंत कृष्णा देवकर (Hanmant Krishna Deokar) याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णत पिंगळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

हे देखील पहा -

नक्की काय घडला प्रकार ?

27 ऑक्टोबरला पहाटे हणमंत देवकर पेट्रोलिंग करीत असताना. एक महाविद्यालयीन तरुण त्याच्या मैत्रणीला भेटून वसतीगृहात येत असताना तेथे उपस्थित असलेल्या तरुणाला हवलदार हणमंत कृष्णा देवकरने अडवले. आता कोठून आलास  इथे काय करतोयस ? अशी विचारणा केली. संबंधीत युवकाने मी मैत्रिणीला भेटून आलो आहे असे सांगितले. हवालदाराने त्या युवकांकडून त्याचा Phone Number घेतला. 29 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ येत हणमंत हवलदार याने त्या युवकांस फोन करुन भेटायला ये असे सांगितले. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संबंधीत तरुण पोलिसांना भेटला.

संतापजणक : मैत्रीणीचा नंबर देण्यास नकार दिल्याने पोलिसाने तरुणासोबतच ठेवले शारिरीक संबंध; गुन्हा दाखल
Dhule : प्रशासनाच्या दबावतंत्रामुळे दोन ST कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू !

दरम्यान पोलिसांने युवकाकडे पैशाची मागणी केली तसेच पैसे दिले नाहीतर तुझे प्रेमप्रकरण तुझ्या आणि मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिल्याने युवकाने भितीपोटी हवालदाराला 4 हजार रुपये दिले. मात्र हवालदार तेवढ्यावरतीच न थांबता त्याने त्या तरुणाला मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, (Girlfriend's Mobile Number) तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग असे सांगितलं. संबंधीत तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे. असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिल्याने देवकर याने त्या मुलाला त्याच्याबरोबरच शाररिक सबंध ठेवण्याची सक्ती केली त्याने त्या तरुणाला वसतीगृहातील रुमवर नेले. आणि त्याच्यासोबत अनैसर्गिक संबंध (Unnatural relationships) ठेवलेच आणि त्याची व्हीडीओ क्लिप (Video clip) देखील तयार केली.

21 नोव्हेंबरला देवकर याने पुन्हा त्या युवकास फोन करुन महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले व शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र युवकाने नकार दिला असता मोबाईलमधील क्लीप व्हायरल करण्याची धमकी युवकाला दिली त्यामुळे शेवटी संबंधीत तरुणाने हा सर्व प्रकार आपल्या मित्रांना सांगून हवलदार देवकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ हवलदार देवकर याला अटक केली असून. दरम्यान हवालदार देवकर याच्यावरती खंडणी, अनैसर्गिक संबंध ठेवणे, अश्लील क्लिप (Pornographic clips) तयार आणि व्हायरल करणे, धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com