डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटविण्यासाठी केलेल्या उपोषणाची परवानगी, पोलिसांनी ऐनवेळी नाकारली

पोलिस आणि आंदोलक समोरासमोर आल्याने, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटविण्यासाठी केलेल्या उपोषणाची परवानगी, पोलिसांनी ऐनवेळी नाकारली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटविण्यासाठी केलेल्या उपोषणाची परवानगी, पोलिसांनी ऐनवेळी नाकारलीसुरेंद्र रामटेके

वर्धा : वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील (अी.Babasaheb Ambedkar statue) पेट्रोल पंप हटविण्यात यावा यासाठी आंबेडकरी जनतेकडून अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज सकाळी साखळी उपोषण आयोजित करण्यात आले मात्र या साखळी उपोषणाला पोलिसांनी ऐनवेळी परमिशन नाकारली आणि परवानगी नाकारल्यामुळे हे आंदोलन (Movement) स्थगित करावे यासाठी पोलिस प्रशासनाने आपला मोठा फौजफाटा घेऊन आंदोलन स्थळी दाखल झाले. (The police refused to allow the hunger strike)

हे देखील पहा-

पोलिस (Police) आणि आंदोलक समोरासमोर आल्याने या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते अखेर आंदोलन आणि पोलिसांमध्ये चर्चा होऊन उपोषण करणाऱ्या पेट्रोल पंप कृती समितीच्या सदस्य शारदा झांबरे (Sharda Zambare) व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक अटक केली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता यावेळी अटक करण्यात आलेल्या कडून सांगण्यात आले की काही अनुचित प्रकार घडल्यास यास राज्य सरकार (State Goverment) व प्रशासन जबाबदार राहील असे शारदा झांबरे यांनी सांगितले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com