गोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांच्या घरी सरकारमुळे दाटला अंधार!

गोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांच्या घरी सरकारमुळे दाटला अंधार!
वीजजोड तोडल्याने गोसे खुर्दच्या प्रकल्पग्रस्तांनी महावितरणच्या छतावर बसून आंदोलन केले.

भंडारा ः गोसे खुर्द प्रकल्पामुळे अनेक गावे विस्तापित झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, त्यांच्या घरी सरकारमुळेच अंधार दाटलाय. या पुनर्वसित गावाचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीजजोड तोडण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत तब्बल 100 लोकांची वीज कापली आहे.

वीजजोड तोडल्याने गावकऱ्यांवर कोणी वीज देता का वीज! अशी म्हणण्याची वेळ आली आहे. गोसे खुर्द धरणासाठी गावकऱ्यांनी जमिनी दिल्या. मात्र, त्यांच्या नशिबी सरकारी अनास्थाच आहे. अगोदरच प्रशासनाने गोसेसाठी ग्रामस्थांच्या शेतजमीन घेतल्याने शेतकरी बेरोजगार झाले. हाताला काम नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात इल्गार पुकारला आहे. महावितरणविरोधात त्यांनी आंदोलन छेडले आहे.The power supply to the villages in the Gose Khurd project area was cut off

वीजजोड तोडल्याने गोसे खुर्दच्या प्रकल्पग्रस्तांनी महावितरणच्या छतावर बसून आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या विरोधात मोहाडीत राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

महत्वाकांशी राष्ट्रीय प्रकल्प अशी ओळख असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पात भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील अनेक गावे प्रभावित झाली आहेत. त्यांच्या शेत जमिनी प्रशासनाने घेतल्या. तब्बल दोन्ही जिल्ह्यांतील 85 गावांचे पुनर्वसन झाले तर अद्यापि अनेक गावे मोबदल्यापासून वंचित आहेत. सुपीक शेतजमिनी प्रशासनाने हस्तांतरित केल्या. ग्रामस्थांचे पुनर्वसन करताना त्यांना शेत जमिनी किंवा नोकरीही मिळालेल्या नाही. अशात शेतीच्या माध्यमातून होणारे उत्पन्ननही हातून हिरवल्याने अनेक प्रकल्पग्रस्त आजही रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत.

गोसे खुर्द धरणात शेती गेल्याने हजारो नागरिक रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. शेती नसल्याने उत्पन्नाचे साधनही हिरावले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाकडे नोकरीसाठी विनवण्या केल्या. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष सुरू आहे. अशात प्रकल्पग्रस्तांच्या घरातील व गावाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, प्रकल्पग्रस्तांचा डिसेंबर 2022 पर्यंत वीज बिल माफ करण्याचे निर्देश महावितरण कंपनीला भाजप सरकारमधील तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 11 सप्टेंबर 2019 ला दिले होते.

त्यानुसार मागील दीड वर्षांपासून महावितरण कंपनीने प्रकल्पग्रस्तांचा विद्युत पुरवठा व त्याचे देयक या बाबत 'ब्र'ही काढला नाही. मात्र, मागील तीन दिवसांपासून याच महावितरण कंपनीने गोसे खुर्द धरण प्रकल्पबाधितांच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. घरातील लहान मुले, वृद्ध आणि विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. आता पावसाळा आल्याने स्वापदांचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी गावात भीतीचे वातावरण आहे.

गोसे धरणामुळे परिसरात हरितक्रांती निर्माण होईल आणि जिल्हा सुजलाम सुफलाम होईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यावर विसंबून प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी सढळ हाताने शेतजमिनी शासनाला दिल्या. मात्र, त्यानंतर ग्रामस्थांचे होत्याचे नव्हते झाले, असे गावकरी म्हणतात.

एकंदरित शासनाच्या ""तळ्यात-मळ्यात"" वृत्तीने पुनर्सवित त्रासले आहेत. ऐनवेळी शासनानेच घुमजाव केल्याने आता करावे काय हाच सवाल गावकारी विचारताय.

या बाबत भंडारा वीज वितरण कंपनीशी संपर्क साधला असता तसा आदेश आला आहे. वीज भरा अन्यथा ती खंडित केली जाईल, असे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सांगितले.The power supply to the villages in the Gose Khurd project area was cut off

गावकऱ्यांत असंतोष

सरकारच्या आश्वासनामुळे मागील दीड वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी वीजबिलापोटी एक रुपयाही भरला नाही. वीज कर्मचाऱ्यांनीही वीज पुरवठा खंडित केला नाही. आता मात्र, त्यांनी पवित्रा बदलला आहे. आता रात्रीला मोठ्या अडचणींना समोर जावे लागणार आहे. त्यामुळे महावितरणने उगारलेल्या या पवित्र्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष उफाळला आहे.

- विमला शहारे, सरपंच.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com