Buldhana News: जिल्ह्यात रेती माफियांचा सुळसुळाट; सव्वा कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई!

देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रात सरार्सपणे रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे.
Buldhana News:
Buldhana News:Saam TV

संजय जाधव

Buldhana News: जिल्ह्यात रेती माफियांचा सुळसुळाट सुरु आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील डीग्रस बुद्रुक येथे खडकपूर्णा नदीपात्रावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात ५ बोटी, २ पोकलॅण्ड, २ टिप्पर व ५४० ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ५ जणांविरुद्ध तब्बल १ कोटी ३६ लाखांचा दंड ठोठावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Latets Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यावरण संस्था, पोलीस, सरकारी यंत्रणा, महसूल विभाग या सर्वांच्या कारवाईनंतरही ठाण्यातील खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरूच आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे.

Buldhana News:
Beed Sand Mafia : बीड जिल्ह्यात वाळू माफियांची खुलेआम गुंडगिरी; पाहा व्हिडीओ

त्यासोबतच या बेकायदा वाळू (Sand) उपशामुळे सरकारचा महसूल बुडत आहे. सरकारी नियम, शर्थी, फौजदारी दखलपात्र कलमे, वेगवेगळ्या प्राधिकरणांची मार्गदर्शक तत्वे, पोलीस कारवाई आणि सामाजिक संस्थेचा दबाव या सर्व गोष्टी झुगारून जिल्ह्यासह देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रात सरार्सपणे रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे.

Buldhana News:
Sand smuggler | वाळू तस्करांचा एसडीओ पथकावर हल्ला, काय असेल हल्ल्या मागचं कारण?, पाहा व्हिडीओ

अशा रेती माफियांच्या हालचालींवर स्थानिक पोलिसांचे (Police) लक्ष आहे. मात्र अनेक व्यक्ती यात शामील असल्याने वाळू माफियांवर कारवाई केली जात नाही. असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून संयुक्तिक कारवाई करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com