जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याधापकाने मागितली शिक्षिकेकडे लाच

सेवानिवृत्तीचे शेवटचे ४ वर्ष उरलेले असताना या लाचखोर मुख्याधापकाने ही करामत केली आहे.
Buldna Crime News
Buldna Crime Newsसंजय जाधव

बुलडाणा : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेला त्याच शाळेच्या लाचखोर मुख्याध्यापकाने २००० हजारांची लाच मागितल्याचा प्रकार बुलडाण्यात (Buldhana) उघडकीस आला आहे. मुख्याध्यापकाकडे एका खाजगी व्यक्तीने माहितीच्या अधिकारात शिक्षकांच्या घरभाड्यासंदर्भात माहिती मागितली होती.

मी सत्य माहिती सादर करणार नाही. पण त्यासाठी २ हजार रुपये द्या; अशी मागणी मुख्याध्यापकाने शिक्षिकेकडे केली होती. या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे येताच ACBने लाचखोर मुख्याध्यापकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे.

Buldna Crime News
धान्य व्यापा-यास जिवे मारण्याची धमकी; एमआयडीसीतून दाेन तासांत एकास अटक

सदर कारवाई खामगाव तालुक्यातील आवार येथील जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. नरहरी विश्वनाथ टिकार (५४, रा. अभय नगर, घाटपुरी नाका, बुलडाणा) असं अटक करण्यात आलेल्या लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्तीचे शेवटचे ४ वर्ष उरलेले असताना या लाचखोर गुरूजीने ही करामत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खाजगी व्यक्तीने शिक्षकांच्या घर भाड्याबाबत माहितीच्या अधिकारात मुख्याध्यापकांना माहिती मागितली होते. सत्य माहिती सादर न करण्यासाठी या लाचखोर मुख्याध्यापकाने शिक्षेकेला २ हजार रुपये मागितले. मात्र शिक्षिकेला लाच द्यायची नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. (Anti-Corruption Division)

पाहा व्हिडीओ -

तक्रारीची सत्यता पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज जिल्हा परिषद शाळेच्या आवारात साफळा रचला आणि लाच घेतांना लाचखोर मुख्याध्यापक टिकारे याला रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात (Khamgaon Rural Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याधापकला अटक करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com