औरंगाबादमध्ये ज्या महिलेची छेड काढली, त्याच महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चोपला!

भरधाव जाणाऱ्या रिक्षातून एक महिला 'भाऊ या रिक्षाला थांबवा' म्हणून मोठ्याने आवाज देत होती.
औरंगाबादमध्ये ज्या महिलेची छेड काढली, त्याच महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चोपला!
औरंगाबादमध्ये ज्या महिलेची छेड काढली, त्याच महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चोपला!डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात तरुणींनी रिक्षातून उडी मारल्याची घटना ताजी असताना आज (Aurangabad) शहरात असाच एक प्रकार सामोर आला आहे. शहरातील सलीम आली परिसरात भरधाव जाणाऱ्या रिक्षातून एक महिला 'भाऊ या रिक्षाला थांबवा' म्हणून मोठ्याने आवाज देत असताना रस्त्याने जाणाऱ्या बाळासाहेब गरुड यांनी रिक्षाला (Rickshaw) गाडी आडवी लावून विचार पूस केली असता हा रिक्षा चालक मदधुंद अवस्थेत एकटी महिला पाहून रिक्षा भरधाव चालवत होता शिवाय महिलेशी अश्लील शब्दात गैर वर्तन करत असल्याचा प्रकार सामोर आला. (The rickshaw puller who molested the woman was beaten)

हे देखील पहा-

इतर नागरिक गाळा झाल्यानंतर संतप्त महिलेने या रिक्षा चालकाला भर रस्त्यात चांगलाच चप्पलेचा मार दिल्याचा प्रकार आज दुपारी घडला आहे. संधीचा फायदा घेत हा रिक्षा चालक फरार झाला दरम्यान नागरिकांनी या महिलेला धीर देत या महिलची सुटका केली मात्र भर दिवसा घडलेल्या या प्रकाराने रस्त्यावर एकच गर्दी जमली होती.

औरंगाबादमध्ये ज्या महिलेची छेड काढली, त्याच महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चोपला!
सोलापूरातील तरुणाने साकारला शरद पवारांच्या 'त्या' ऐतिहासिक सभेचा देखावा

रोज महिलांवरती अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच हा आजचा प्रकार घडण अतिशय चिंचाजनक आहे एकिकडे सरकार कठोर कारवाई करु असं म्हणत आहे मात्र आरोपींना शिक्षा होत नसल्यानेच कोणही उठसुठ स्त्रीयांवरती अत्याचार करण्यास धजावत आहे असं नागरिकांच म्हणन आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com