Beed: 120 बाेगस शिक्षकांना केलं जाणार कार्यमुक्त; पगारही वसूल हाेणार

सर्वच बोगस शिक्षक खाजगी संस्थेतीच्या शाळेत नोकरीला
Beed News
Beed NewsSaam tv

बीड - राज्यात सर्वत्र गाजत असलेल्या टीईटी (TET) घोटाळ्यात, बीड (Beed) जिल्ह्यातील 120 शिक्षकांचा समावेश आहे. या 120 शिक्षकांनी बोगस टीईटी प्रमाणपत्र हस्तगत करून विविध अनुदानित खासगी संस्थेत नोकरी मिळवली आहे. या बाबत बीड जिल्हा परिषदेने, 120 बोगस टीईटी प्रमाणपत्रे हस्तगत केले आहेत शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळालीय.

शिक्षण विभागाला याबाबत अधिकृत आदेश आल्यानंतर, या शिक्षकांची संस्थेतली सेवा कार्यमुक्त केली जाणार आहे. विशेष म्हणजे या बोगस बहाद्दर शिक्षकांकडून, उचलण्यात आलेला पगार वसूल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

विशेष म्हणजे या 120 पैकी जिल्हा परिषदेचा एकही शिक्षक नाही. मात्र आंतर जिल्हा बदलीने बीड जिल्हा परिषदेला एखादा बोगस टीईटी प्रमाणपत्र धारण केलेला शिक्षक आहे का ? हेही तपासण्यात येत आहे. या बोगस शिक्षकांची किती वर्षे सेवा झालेली आहे, त्यांनी किती पगार उचललेला आहे, याबाबत तपासणी करणे चालू आहे.

Beed News
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा; ९७ टक्के क्षेत्रावर झाल्या पेरण्या

शासनाचे आदेश यांच्या बाबतीत अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले नाहीत. मात्र येत्या एक-दोन दिवसात हे आदेश प्राप्त होतील. त्यानंतर ज्या संस्थेत हे शिक्षक आहेत, त्या संस्था चालकाला पत्र देऊन, या शिक्षकांची सेवा कार्यमुक्त करण्यात येणार आहे. सोबतच सेवा कालावधीमध्ये यांनी उचललेला पगार वसुलही करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com