सरपंच पत्नीच्या नवऱ्याने ग्रामपंचायत सदस्याला केली 'जातीवाचक' शिवीगाळ!

महिला सरपंचाच्या पतीने ग्रामपंचायत सदस्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोपेसर ग्रामपंचायत घडली आहे.
सरपंच पत्नीच्या नवऱ्याने ग्रामपंचायत सदस्याला केली 'जातीवाचक' शिवीगाळ!
सरपंच पत्नीच्या नवऱ्याने ग्रामपंचायत सदस्याला केली 'जातीवाचक' शिवीगाळ!SaamTv

गोंदिया : महिला सरपंचाच्याsarpanch पतीने ग्रामपंचायत सदस्याला जातीवाचक Racist शिवीगाळ केल्याची घटना गोंदिया Gondiya जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोपेसर ग्रामपंचायतGrampanchayatघडली असून ह्या प्रकरणी 6 जणाविरुद्ध पोलिसात गुन्हाFIR दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भाजपाच्या महिला सरपंच यांचे पती तिरूपती हेमराज राणे, तसेच हेमराज राणे यांच्या बरोबर असणारे त्यांच्या घरातील इतर सदस्य मदन नामाजी राणे, खुमेंद्र धनराज राणे, हेमराज काशीराम राणे, राजेश अशोक राणे व संतोष अशोक राणे यांचाही या प्रकरणात समावेश आहे.The sarpanch's husband insulted the grampanchayat member

हे देखील पहा-

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोपेसर ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करणार्‍या भाजपाच्या सरपंच महिलेच्या पतीला विरोध करण्यात आला होता. यासाठी त्या सरपंचांच्या पतीने ग्रामपंचायत सदस्य चंद्रकुमार भाऊदास बिंझाडे यांना जातीवाचक शिवीगाळ दिली. तसेच जेसीबीने खड्डा खोदून त्यात गाडून मारून टाकण्याची धमकी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी दिली. यावेळी महिला सरपंचच्या पतीच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनीही ग्रामपंचायत सदस्याला जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले असल्याचीतक्रार बिझाड़े यांनी तिरोडा पोलिसांत केली आहे.

सरपंच पत्नीच्या नवऱ्याने ग्रामपंचायत सदस्याला केली 'जातीवाचक' शिवीगाळ!
राणेंना मुंबईकरांचा आशिर्वाद नव्हे; तळतळाटच मिळणार - भाई जगताप

बिंझाडे यांच्या तक्रारीवरून अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये महिला सरपंच यांचे पती तिरूपती हेमराज राणे यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव करीत आहेत.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com