पदवीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचे सर्व्हर अचानक बंद !

ऑफलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.
पदवीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचे सर्व्हर अचानक बंद !
पदवीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचे सर्व्हर अचानक बंद !दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA , B Com आणी BSC पदवी अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान पहिल्याच पेपर वेळी अचानक सर्व्हर बंद झाल्याने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात एकच गोंधळ उडाला. The server for the final year of graduation online exams shuted down

अनेक विद्यार्थ्यांना केवळ 5 प्रश्न सोडवल्यानंतर आपोआप अपलोड होत बाकीचे 35 प्रश्न तसेच राहिले ! हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाऊस पडला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने सदर परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी केली आहे.

हे देखील पहा-

दरम्यान पर्यवेक्षकांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे सांगण्यात आले आहे. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायक जाधव यांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांशी घडलेला प्रकार सांगितला आहे. यावर विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असाच प्रकार लातूर शहरातील अनेक महाविद्यालयात देखील घडला असल्याचे समोर आलं आहे.

पदवीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचे सर्व्हर अचानक बंद !
खचलेल्या करूळ घाटावरून नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

यावर विद्यार्थ्यांचा भविष्य अवलंबून असल्याने विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा घेऊन न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. पण सध्याच्या कोरोना काळात विद्यापीठ काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com