२०१९ मध्ये मला संपविण्याचा प्रयत्न पण..., देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक खुलासा; पाहा Video

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला - फडणवीस
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam TV

नागपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (NCP, Congress And Shivsena) तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात ते मला संपवू शकले नाहीत, यापुढेही संपवू शकणार नाहीत. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप केला आहे.

काल बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पदाधाकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. 'देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक आहे', असं ठाकरे म्हणाले होते.

पाहा व्हिडीओ -

त्यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, 'मी त्यांना एवढेच सांगतो, मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है, तुम्ही २०१९ मध्येही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला.

ठाकरेंचे निराशेचा अरण्य रुदन

काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात मला संपवू शकला नाहीत आणि यापुढेही संपू शकणार नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. तर कालंच भाषण म्हणजे निराशेचा अरण्य रुदन होतं असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.

पाहा व्हिडीओ -

तसंच आम्ही लीगली निवडून आलो. मात्र, तुम्ही आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हा का राजीनामे दिले नाहीत, तेव्हा का निवडणुका घेतल्या नाहीत. हिम्मत होती तर तेव्हा राजीनामे देऊन निवडून यायचं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायला पाहिजे होतं असंही फडणवीस म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com