चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार

आरोपी महिलेच्या वेशात बुरखा घालून हातात असलेल्या लेडीज हँडबॅगमध्ये पिस्तूल लपवून आला होता.
चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार
चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार Saam Tv

चंद्रपूर शहरातील मध्यभागी असलेल्या रघुवंशी व्यापार संकुलात भर दुपारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश अंदेवार नामक 32 वर्षीय युवकावर हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपी महिलेच्या वेशात बुरखा घालून हातात असलेल्या लेडीज हँडबॅगमध्ये पिस्तूल लपवून आला होता. प्राथमिक माहितीनुसार 3 आरोपी घटनास्थळी गोळीबार करून पसार झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींचे मत आहे. या घटनास्थळी रिकामी काडतुसे आणि लेडीज हँडबॅग आढळून आली.

जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात वर्षभरापूर्वी झालेल्या बहुरीया हत्याकांडातील टोळीयुद्धाचा हा ताजा प्रकार असल्याची माहिती पुढे येत आहे. हल्लेखोरांनी पळताना 3 गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याची माहिती आहे. पोलिस अधीक्षक स्वतः पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com