रस्त्यावरची भरधाव गाडी घुसली शेतात; शेतकामगारांची उडाली दैना

रत्यावरुन भरधाव वेगाने जाणारी टाटा सफारी गाडी अचानक रस्त्यानजिकच्या रानात शिरल्यामुळे त्या शेतामध्ये काम करत असलेले शेतमजूरांची एकच दैना उडाली.
रस्त्यावरची भरधाव गाडी घुसली शेतात; शेतकामगारांची उडाली दैना
रस्त्यावरची भरधाव गाडी घुसली शेतात; शेतकामगारांची उडाली दैनासागर आव्हाड

रत्यावरुन भरधाव वेगाने जाणारी टाटा सफारी गाडी अचानक रस्त्यानजिकच्या शोतामध्ये शिरल्यामुळे त्या शेतामध्ये Farm काम करत असलेले शेतमजूरांची Farmer एकच दैना उडाली आणि ते सैरावैरा पळू लागले या अचानक घडलेल्या घटनेमुळे कामगारांची एकच दैना उडाली आणि त्यांनी या सगळ्यांमधून स्वतःचा जीव वाचवला. The speeding vehicle suddenly entered the farm

ही सदरची घटना मुळशी Mulashi तालुक्यातील पौड-भरे रस्त्यावर अंबडवेट गावच्या हद्दीत घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही.शेतामध्ये काम करणारे कामगार पुर्णरित्या सुखरुप आहेत मात्र गाडीतले ३ जण किरकोळ जखमी आहेत.Accident

पौड-भरे रस्त्यावरुन नियनित अनेक गाड्या प्रवास करत असतात. आज दुपारी शेतात लावणी चालू असतानाच रस्त्यांवरील गाड्यांपैकी एक पांढऱ्या रंगाची टाटा सफारी (MH 14 HC 9414) ही अचानक सुसाट वेगाने काही कळायच्या आतच रस्त्यालगत असलेल्या शेतात घुसली.

शेत रस्त्याच्या रुंदीपासून खोल होते आणि शेतात त्यावेळी भातलावणी चालू होती. अचानक घुसलेली गाडी पाहून शेतातील कातकरी मजूर सैरावैरा पळाले मात्र नंतर ते स्थिर होऊन गाडीकडे आले आणि गाडीतील नागरिकांना मदतही केली.

सुदैवाने मजुरांना यात दुखापत झाली नाही. मात्र गाडीतील तीन व्यक्ती जखमी झाले आहेत. दरम्यान ती अपघातग्रस्त गाडी शेतातून बाहेर काढली आहे.

Edited By - Jagdish Patil

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com