ST आंदोलन अजूनही धगधगतच.. दिग्रस डेपोतील बसवरती अज्ञातांकडून दगडफेक

राज्यात सुरु असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळतच आहे काही ठिकाणी बस सुरु झाल्या असल्या तरी देखील अजून काही ठिकाणी बसेस वरती दगडफेक होताना दिसत आहे.
ST आंदोलन अजूनही धगधगतच दिग्रस डेपोतील बसवरती अज्ञातांकडून दगडफेक
ST आंदोलन अजूनही धगधगतच दिग्रस डेपोतील बसवरती अज्ञातांकडून दगडफेकसंजय राठोड

संजय राठोड -

यवतमाळ : राज्यात सुरु असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळतच आहे. काही ठिकाणी बस सुरु झाल्या असल्या तरी देखील अजून काही ठिकाणी बसेस वरती दगडफेक होताना दिसत आहे. अशातच यवतमाळच्या दिग्रस डेपोतील दारव्हा दिग्रस कडे येत असताना दिग्रस तालुक्यातील रोहनादेवी ते मांडवा रस्त्यावरती अज्ञातांनी एसटीवरती दगडफेक केली आहे.

हे देखील पहा -

या दगडफेकीमुळे एसटी बसच्या (ST Bus) काचा फुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. दिग्रस आगारातून चालक विक्रम पवार व वाहक पवन जाधव यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतांना देखील बस क्रमांक MH-40 N-8927 या क्रमांकाची बस रस्त्यावर काढली. दिग्रस येथून 7 प्रवासी घेऊन दारव्हा येथे गेले व दारव्हा येथून परत येत असतांना रोहनादेवी ते मांडवा या मार्गावर काही अज्ञात इसमांनी बसला दोन दगड मारल्यामुळे ST च्या चालकाच्या बाजूच्या काचा व एसटीच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाजवळील प्रवासी खिडकीच्या काचा फुटल्या आहेत.

ST आंदोलन अजूनही धगधगतच दिग्रस डेपोतील बसवरती अज्ञातांकडून दगडफेक
धक्कादायक : ड्रग्जसाठी पैसे नाहीत म्हणून केले अल्पवयीन मुलाचे अपहरण

दरम्यान दिग्रस आगार प्रमुख संदीप मडावी यांनी एसटी चालक व वाहकाला घेऊन दिग्रस पोलीस ठाणे गाठून दगड मारल्याची तक्रार दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com