राज्य सरकार चित्रपट आणि नाट्य यांना देणार उद्योगाचा दर्जा

लावणी महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
राज्य सरकार चित्रपट आणि नाट्य यांना देणार उद्योगाचा दर्जा
राज्य सरकार चित्रपट आणि नाट्य यांना देणार उद्योगाचा दर्जाSaamTVnews

लातूर : लातूरमध्ये राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने तीन दिवसीय लावणी महोत्सवाच (Lavani Mahotsav) आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह अनेक नाट्य, सिने आणि लावणीसह विविध कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हे देखील पहा :

राज्यातील नागरिकांना राज्याच्या विविध भागातील कला माहित व्हावी यासाठी लातूरात (Latur) राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने 3 दिवसीय लावणी महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आगामी काळात चित्रपट (Cinema) आणि नाट्य क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्य सरकार लवकरच या कलांना उद्योगाचा दर्जा देणार आहे. यामुळे या क्षेत्रात भविष्यात मोठी गुंतवणूक वाढेल. सध्याला या क्षेत्राचं मुंबई इथं केंद्रीकरण झाले असल्याने ग्रामीण कलावंतांना म्हणावी तितकी संधी उपलब्ध होत नाही.

राज्य सरकार चित्रपट आणि नाट्य यांना देणार उद्योगाचा दर्जा
गुजरातमध्ये पेट्रोल १४.३४ रुपयांनी स्वस्त

यासाठी पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर आणि लातूर या शहरात आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. कोरोना (Corona) महामारीच्या काळानंतर आता राज्य शासनाने लावणी महोत्सव आयोजित केला आहे. यामुळे कला आणि कलाकारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राजाश्रय असल्याशिवाय कला आणि कलाकार जीवंत राहू शकत नाही. उतार वयात कलाकारांना उपेक्षित जीवन जगावं लागत असून मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आजही कायम आहे. यासाठी राज्य शासनाने आवश्यक ती शासकीय मदत वृद्ध कलाकार आणि त्यांच्या मुलामुलींनी द्यावी अशी अपेक्षा लावणी कलावंतांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com