एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा पेच चौदाव्या दिवसानंतरही कायम

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा पेच चौदाव्या दिवसानंतरही कायम
एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा पेच चौदाव्या दिवसानंतरही कायमSaam Tv

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संपाचा पेच चौदाव्या दिवसानंतरही कायम आहे. त्यात एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या कारवाई होत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. गेल्या चौदा दिवसांपासून औरंगाबादच्या मुख्य बस स्थानकात ठिय्या आंदोलन करणारे मच्छिंद्र बनकर आणि गजानन पवार.

हे देखील पहा -

राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा निर्णय कधी होतो याची वाट पाहत आहेत. मात्र राज्य सरकार आणि महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचे निलंबन, कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती आणि खाजगीकरणाचा विषय समोर आणत असल्याने या दोघांना त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाटत आहे.

गेली पंधरा वर्ष एसटी महामंडळामध्ये नोकरी करीत असताना कधी असा दिवस येईल हे त्यांना वाटलं नव्हतं. स्वतःचा आजार, भविष्यात जर महामंडळाने कोणती कारवाई केली तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांचे शिक्षण, लग्न कशी करायची ही चिंता त्यांना भेडसावत आहे. ही स्थिती या दोघांची नाही तर गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्रभरातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा पेच चौदाव्या दिवसानंतरही कायम
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात

गेल्या चौदा दिवसांपासून राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही. एसटीची चाके अजूनही रुतली आहेत. बस स्थानक ओस पडली आहेत. त्यात कर्मचारी कुठे आत्महत्या करता आहेत. तर कुठे चिंतेने आजारी पडल आहेत. त्यात कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चिंताही वाढली आहे. राज्यातील लाखाच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या सहा ते सात लाख कुटुंबीयांचाही प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे आता संप अधिक काळ न चिघळवता तोडगा काढणे गरजेचे आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com