लातुर हादरलं! दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार करून विद्यार्थ्यांचा खून

लातूर शहरामधील विशाल नगर भागात श्री साई मंदिर लगत भर रस्त्यावर इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना
Latur! दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार करून विद्यार्थ्यांचा खून
Latur! दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार करून विद्यार्थ्यांचा खूनSaam Tv

लातूर : लातूर (Latur) शहरामधील विशाल नगर भागात श्री साई मंदिर लगत भर रस्त्यावर इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा शासकीय रुग्णालयात (hospital) मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (the students were attacked with scythe incidents in the latur)

हे देखील पहा-

घटनास्थळी पोलिसांनी (police) भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेमुळे लातुरात (Latur) एकच खळबळ उडाली आहे. मयत मुलाचे नाव राहुल सुरेश उजळंंबे (१९, रा. मोती नगर, लातूर) असे आहे. हल्लेखोरांचा पोलीस (police) शोध घेत आहेत. एकाला ताब्यात घेतले आहे. याविषयी एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Latur! दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार करून विद्यार्थ्यांचा खून
Mumbai: लज्जास्पद! पतीला डांबून महिलेवर केला बलात्कार; आरोपीची पोलिसांनी धिंड काढली

हा खून कोणत्या कारणाकरिता घडला आहे. याचा देखील पोलीस तपास करत आहेत, असे लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com