गणेशोत्सव विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

कोरोनाच्या सावटाखाली रविवारी श्री गणरायाचा विसर्जन सोहळा भक्‍तीमय वातावरणात आणि शांततेत पार पाडण्याकरिता महापालिका आणि पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज
गणेशोत्सव विसर्जनासाठी प्रशासन सज्ज
गणेशोत्सव विसर्जनासाठी प्रशासन सज्जसंभाजी थोरात

कोल्हापूर : कोरोनाच्या सावटाखाली रविवारी श्री गणरायाचा विसर्जन सोहळा भक्‍तीमय वातावरणात आणि शांततेत पार पाडण्याकरिता महापालिका आणि पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर घरगुतीसह सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनासाठी संकलन केंद्रे, विसर्जन केंद्रे आदी ठिकाणी पोलिस कर्मचारी, महापालिका कर्मचारी आणि गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा-

शहरातील मानाचा तुकाराम माळी गणेश मंडळाचा गणपतीचं विसर्जन सकाळी 9 वाजता होणार आहे. मंडळापासून 100 मीटर अंतरावर उभारण्यात आलेल्या जलकुंडात विसर्जन होईल. पालकमंत्री सतेज पाटील, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित राहणार आहेत.

गणेशोत्सव विसर्जनासाठी प्रशासन सज्ज
आसले गावच्या सुपुत्राला लडाख मध्ये वीरमरण

कोल्हापूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येत आहे. गणेश विसर्जनावेळी कोठेही गर्दी होऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनकडून करण्यात आले आहे. शहरातील सर्वच मुख्य मंडळांच्या गणेशाचं विसर्जन साध्या पध्दतीने होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.