नंदुरबारमध्ये हुडहुडी; तापमानाचा पारा घसरला

शितलहरीमुळे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सर्वाधिक कमी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
नंदुरबारमध्ये हुडहुडी; तापमानाचा पारा घसरला
नंदुरबारमध्ये हुडहुडी; तापमानाचा पारा घसरला दिनू गावित

नंदुरबार - हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात थंडीमध्ये प्रचंड वाढ झाली असून शहरी भागात तापमान १०°c अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ परिसरासह, सातपुड्यातील डाब, मोलगी, धडगाव, अक्कलकुवा भागात तापमान ७°c अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. ग्रामीण भागामध्ये थंडीपासून बचावासाठी नागरिक गरम कपड्यांचा व शेकोटीचा आधार घेत आहे.

हे देखील पहा -

शितलहरीमुळे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सर्वाधिक कमी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या आठवडाभर जिल्ह्यात शितलहर कायम राहणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात ७°c अंश तर सपाटीच्या भागातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात १०°c अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

नंदुरबारमध्ये हुडहुडी; तापमानाचा पारा घसरला
पंकजाताई माझी औकात काढताना 2019 चा पराभव विसरलात का? धनंजय मुंडेंचा घणाघात (Video)

नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी गरम कपडे परिधान करावे तसेच केळी, पपई फळबागा प्लास्टिकने गुंडाळावे, गाय, बैल, बकरी आदी जनावरांना उघड्यावर न बांधता बंद घरात गोठ्यात बांधावे, कुकुट पालन शेतकऱ्यांनी शेडला पडदे लावून १०० डिग्री तापमान लाईटचा वापर करावा, असे आव्हान कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारच्या तोरणमाळ डाब मोलगी परिसरात हुडहुडणारी थंडीने जनजीवन विस्कळीत होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com