Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv

Mumbai News: बाबो! एका चपलेने आणली ४० तोळे सोन्याची चोरी उघडकीस; डोंबिवली मानपाडा पोलिसांची कारवाई

आरोपीला अटक करत तिच्याकडून ४० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

Mumbai News : कार्यक्रमाद्रम्यान महिलेच्या पर्स मधून घराची आणि तिजोरीची चावी चोरली आणि त्या चावीच्या सहाय्याने दोन तासाच्या आत घरात घुसून ४० तोळे दागिने चोरले. मात्र, ही चोरी लपू शकली नाही. कोणताही पुरावा नसताना अथक तपास करत मानपाडा पोलिसांनी चोरट्या मावस बहीणला तिच्या चप्पलच्या आधारे अटक करत ४० तोळे सोने हस्तगत केले आहे. प्रिया सक्सेना डोंबिवली येथील खोणी परिसरात राहतात त्या नवी मुंबई येथील कामोठे येथे कार्यक्रमात गेले असता त्यांची मावस बहीण सिमरन पाटील यांनी हा प्रकार केला होता.

Mumbai Crime News
Satara News : चाळीस कबुतरांचा हाेरपळून मृत्यू, काेणी जाळली ढाबळ; सातारा पाेलिसांपुढे आव्हान

12 जानेवारीला प्रिया सक्सेना आपल्या एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी नवी मुंबई (Navi Mumbai) येथील कामोठे परिसरात गेल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप होते. कार्यक्रमा दरम्यान त्यांनी आपली पर्स पाहिली असता पर्समधून घराचे आणि लॉकरची चावी गायब होती. त्या घरी आल्या असता त्यांना घरातील दागिने देखील चोरीस गेल्याचे लक्षात आले.

चावीची ही चोरी कार्यक्रमादरम्यान झाली असल्याने कोणावर संशय घ्यायचा म्हणून तिने मानपाडा पोलीस (Police) ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसात अधिकारी अविनाश वनवे यांच्या पथकाने तपास सुरू केला. या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासण्यात आले. याच दरम्यान एक महिला संशयितरित्या आढळून आली.

पोलिसांनी जेव्हा या महिलेची चप्पल पाहिली तेव्हा ती सक्सेना हीची मावस बहीण सिमरन पाटील हीची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सिमरनला ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने केलेला गुन्ह्याची कबुली दिली. मानपाडा पोलिसांनी तिच्याकडून चोरी केलेले चाळीस तोळे सोने हप्तगत केले आहे.

Mumbai Crime News
Pune Crime News: एकाच प्रेयसीचा दोन प्रियकरांनी केला खून; जुन्नरमधील धक्कादायक घटना

सिमरनने आधी पर्समधून चावी चोरली त्यानंतर नवी मुंबई येथून ती खोनी पलावा येथे आली. प्रिया यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून तिने दागिने चोरी केले. नंतर पर्समध्ये चावी ठेवायला ती कामोठे येथे कार्यक्रमात देखील पोहोचली मात्र तिला चावी ठेवता आली नाही. सिमरन काही दिवसापूर्वी प्रिया हिच्या घरी राहण्यास आली होती तिने या घराची लेकी केली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com