महाराष्ट्रात चोरायचा गाड्या आणि मध्यप्रदेशात विकायचा; त्या चोराला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

चोराकडून चोरीला गेलेल्या तब्बल 12 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
महाराष्ट्रात चोरायचा गाड्या आणि मध्यप्रदेशात विकायचा; त्या चोराला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
महाराष्ट्रात चोरायचा गाड्या आणि मध्यप्रदेशात विकायचा; त्या चोराला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या! मंगेश मोहिते

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर पोलिसांनीNagpur Police एका चोराकडून चोरीला गेलेल्या तब्बल 12 दुचाकी गाड्याTwo Wheeler जप्त केल्या आहेत एका चोरीला गेलेल्या गाडीचा शोध घेताना नागपूर पोलिसांना वेगवेगळ्या 12 चोरलेल्या दुचाकी गाड्याचा शोध लागला आहे. शिवनी मध्यप्रदेशMadhyaPradesh मधील आरोपी नागपूर मधून दुचाकींची चोरी करुण मध्यप्रदेशात विकायचा आरोपीने चोरी करून विकलेल्या दुचाकी गाड्या देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.The thief was arrested by Nagpur police

हे देखील पहा -

दुचाकी गाडी चोरीला गेली कि वर्षानुवर्ष तिचा पत्ता लागत नाही. ती चोरीला गेल्यानंतर परत मिळेल अशी आशाही कुणाला नसते. मात्र नागपुर मधील अभ्यंकर रोड वरुण एक दुचाकी चोरीला गेली आणि त्याची तक्रार धंतोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या तपास पथकाच्या सहाय्याने गाडी चोरीला गेली त्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्यामध्ये जो आरोपी आढळून आला त्याच्या वरती पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं होतं त्यानंतर आरोपी संदीप तेंभरे याला पोलिसांनी शिवणी मध्य प्रदेश येथून अटक केली आहे.

महाराष्ट्रात चोरायचा गाड्या आणि मध्यप्रदेशात विकायचा; त्या चोराला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
कौटुंबिक वाद मिटवायला 'तो' न्यायालयात गेला, म्हणून जातपंचायतीने त्याच्या कुटुंबावरच बहिष्कार टाकला!

महत्वाची बाब अशी की आरोपी संदीप तेंभरेने अशाच प्रकारे 12 दुचाकी गाड्या चोरल्या आणि त्या विकले असल्याचाही कबूल केलं आहे. पोलिसांनी आरोपीने चोरलेल्या दुचाकी गाड्या होत्या त्या बाराही गाड्या जप्त केल्या आहेत तसेच आरोपीला अटक करून पोलीस कोठडी दिली असून पुढील अधिकचा तपास सुरू आहे हा आरोपी मूळचा शिवणी मध्यप्रदेश मधला असून नागपूर मधून गाड्या चोरी करायचा आणि मध्यप्रदेशात विकायचा असा पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com