माकडीन आणि तिच्या पिल्लाचा प्रसंग वाचून डोळे पाणवतील

माकडांचा कळप पाण्याच्या टाकीजवळ हजर झाला, आणि पाच पंचवीस माकडांच्या झाडावरून माकड उड्या सुरू झाल्या.
माकडीन आणि तिच्या पिल्लाचा प्रसंग वाचून डोळे पाणवतील
माकडीन आणि तिच्या पिल्लाचा प्रसंग वाचून डोळे पाणवतीलविजय पाटील

सांगली: माणसाप्रमाणे प्राणी, पक्षी यांना देखील माया-ममता, काळीज असतं. एक माकडीन आणि तिचे पिल्लू या मायलेकरांच्या बाबतीत असाच एक काळीज हेलवणारा प्रसंग सांगलीच्या नेर्ले येथे घडला आहे. नेर्ले बाजारात लोकांची गर्दी होती. माकडांचा कळप पाण्याच्या टाकीजवळ हजर झाला, आणि पाच पंचवीस माकडांच्या झाडावरून माकड उड्या सुरू झाल्या. एका नर वानराने माकडांच्या मागे धावायला सुरुवात केली. अर्धा तास माकडांचा धिंगाणा सुरू होता. काही माकडं आपल्या पिलांना पोटाशी धरून पाण्याच्या टाकीवर तर कधी ग्रामपंचायतच्या इमारतीवर उड्या घेऊ लागली.

माकडीन आणि तिच्या पिल्लाचा प्रसंग वाचून डोळे पाणवतील
हिंगोली: सोयाबीनच्या विक्रीने शेतकरी मालामाल; बाजार समितीतर्फे सत्कार

जसे घराघरात वाद होतात तसेच प्राण्यांचे सुद्धा एकमेकांच्यात वाद होतात. रागातून एक नर वानर मादी माकडीणीच्या पाठीमागे लागला. ग्रामपंचायतीच्या समोर असणाऱ्या विजेच्या डांबा वर पिलाला घेऊन माकडीन वरच्या टोकावर गेली. आपण आणि आपलं बाळ सुखरूप आहोत असं तिला वाटलं. पण काही क्षणातच तिचा वरील तारेचा शॉक बसला. आणि ती पोटाला धरलेल्या पिलासह जमिनीवर कोसळली. आणि काही क्षणातच तीचा मृत्यू झाला.

बघ्यांची गर्दी झाली आपली आई आता या जगात नाही याची जाणीव त्या पिल्लाला न्हवती. खाली कोसळताना पिलाला तिने घट्ट पकडलं होतं. आईने आपणाला घट्ट पकडावं या आशेने तिच्या पोटात वारंवार शिरत होतं. महिला चुकचूकत होत्या. काहीजण हळहळ व्यक्त करत होते. या प्रसंगाने काहींचे डोळे पाणावले. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आधार अनिमल रीस्पेक्ट टीम युवकांनी सर्व तयारी करून खड्डा खांदला. खड्ड्यापर्यंत पिल्लाने आईला सोडलं न्हवतं. विधिवत दफन करण्यात आलं. आईपासून पिल्लाला बाजूला कसं करायचं हा अनेकांना प्रश्न होता. कारण मेलेल्या आईच्या कुशीतल्या पिलाला वेगळे करताना त्या पिलाचा चित्कार काळीज चिरत होता.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com