Video : प्रवाशाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर ओढलं; RPF जवानांच्या धाडसाचा थरार सीसीटीव्हीत कैद

Wardha Station RFP Saves Traveler : सोबतच महिला आरपीएफ जवान यांनीही त्या प्रवाशाला वाचवण्यासाठी मदत केल्याने त्या प्रवाशाचे प्राण वाचले आहे.
Wardha Station RFP Video
Wardha Station RFP Videoसंजय डाफ

वर्धा: आरपीएपफ जवानांच्या सतर्कतेमुळे वर्ध्यात (Wardha) एका तरुणाला जीवनदान मिळालं आहे. रेल्वेत चढताना तरुणाचा अचानक पाय घसरला आणि तरुण थेट रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये असलेल्या गॅपमध्ये पडला, यावेळी कर्तव्यावर असलेल्या एका आरपीएफ (RPF) जवानाचं याकडे लक्षं गेलं आणि त्याने तत्परता दाखवत त्या तरुणाला वाचवलं, सोबतच महिला आरपीएफ जवान यांनीही त्या प्रवाशाला वाचवण्यासाठी मदत केल्याने त्या प्रवाशाचे प्राण वाचले आहे. हा सगळा थरार प्लॅटफॉर्मवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Wardha RPF News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलैला सकाळी साडेआठ वाजता एका एक्सप्रेसचे वर्धा रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वर आगमन झाले आणि ८:३५ वाजता प्रस्थान होत असताना एका प्रवाशाने चालती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो रेल्वे आणि फलाटाच्या गॅपमध्ये फसला. हे थरारक दृश्य आरपीएफ जवान एस. डी. डीगोले यांना दिसताच त्यांनी त्वरित त्या प्रवाशाकडे धाव घेतली आणि त्या प्रवाशाला अर्धे वर खेचले. इतक्यात महिला आरपीएफ सुशिला वायाम यादेखील धावत आल्या आणि मग दोघांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशाला पकडलं आणि शिताफीने खेचलं.

Wardha Station RFP Video
आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! विनायक मेटेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

या दोघांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशाला चालत्या गाडीखालून प्लॅटफॉर्मवर सुरक्षित खेचून आणलं आणि अखरे त्याचा जीव वाचला आहे. वर्धा रेल्वे स्थानकावरील हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यात प्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अनिल सीताराम तुमसरे (२९) असं प्रवाशाचं नाव आहे. वर्ध्याच्या आरपीएफ जवानांमुळे गेल्या २ महिन्यात ५ प्रवाश्यांचा जीव वाचवण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com