इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढतोय कल

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेली जनता आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे वळू लागलीय.
इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतोय
इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतोयSaam Tv News

औरंगाबाद - जिथं जावं तिथं पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं चित्र आपण सध्या पाहतोय. हे चित्र काही वर्षात बदलेल असं दिसतंय. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेली जनता आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे वळू लागलीय. त्यामुळे पेट्रोलपंपावर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी लागलेल्या वाहनांच्या रांगा एकदा डोळेभरून पाहून घ्या, कदाचित काही वर्षात या रांगा पहायला मिळणार नसतील. (The trend towards electric vehicles is increasing due to rising fuel prices)

हे देखील पहा -

एकट्या औरंगाबाद शहरात गेल्या सहा महिन्यांत २५८ दुचाकी आणि २० चारचाकी अशा २७८ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झालीय. मागच्या वर्षी कोरोना काळातही १५५ इलेक्ट्रिक वाहने औरंगाबादकरांनी खरेदी केले होते. २०१९ या वर्षात २३३ आणि २०१८ मध्ये २२१ ई वाहनांची विक्री झाली. सुरुवातीला दुचाकी वाहनाची खरेदी वाढत होती. आता चारचाकी वाहनांचीही संख्या वाढली आहे. वर्षभरात पेट्रोलच्या दरात तब्बल ३२ रुपयांची वाढ झालीये. देशातील अनेक शहरात पेट्रोल ११० रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात आहे. डिझेलनेही शंभरीचा पल्ला गाठलाय. यावर अनेक आंदोलने झाली तरीही सरकारने दर काही कमी केले नाही. भविष्यात हे दर कमी होण्याऐवजी वाढतच जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे आता ई-वाहने रस्त्यावर येतायत.

इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतोय
Ola electric scooter | 24 तासांत एक लाखांपेक्षा जास्त गाड्या बुक

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या आर्थिक भुर्दंडाबरोबरच इंधनाच्या वाहनांमुळे प्रदूषणही वाढते. त्यामुळे ई-वाहनांची खरेदी वाढू लागलीय. शिवाय आता पर्यावरणपूरक ई-वाहनांना चालना देण्याचे धोरण देशपातळीवर स्विकारण्यात आलंय. त्यासाठी सबसिडीही दिली जातेय. मात्र, या ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बोटावर मोजण्याइतके आहेत. शिवाय चार्जिंगसाठी किमान अडीच ते सहा तासाचा वेळ लागतो. ही अडचण सोडली तर इ-वाहनांचा मार्ग सोपा आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com