Kolhapur Accident : ट्रक खाली येऊन दोन जिवलग मित्रांचे प्राण रस्त्यावरच गेले

कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात भीषण अपघात झाला
Kolhapur Accident : ट्रक खाली येऊन दोन जिवलग मित्रांचे प्राण रस्त्यावरच गेले
Kolhapur Accident : ट्रक खाली येऊन दोन जिवलग मित्रांचे प्राण रस्त्यावरच गेलेSaam Tv

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. चंदगड या ठिकाणी गडहिंग्लज रस्त्यावर झालेल्या अपघातात २ जिवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. उसाच्या ट्रॅक्‍टरला ओव्हरटेक करताना, ट्रॉलीची धडक बसल्याने २ युवकांचा खाली पडून, त्यांना समोरून येणाऱ्या ट्रकने चिरडले आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कॉलेजमधील जवळच्या मित्रांच्या निधनाने गावामध्ये मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.

हे देखील पहा-

जय ज्योतिबा मसरणकर (वय-१९) आणि अजित आप्पाजी पाटील (वय-१८) दोघेही रा. चंदगड तालुक्यातील सातवणे या गावातील मृतांची नावे आहेत. दोघेही कॉलेजमध्ये चांगले मित्र होते. शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जय आणि अजित हे दोघे विजेचे उपकरण घेऊन त्यांच्या दुचाकीवरून अडकूर येथून सातवणेकडे निघाले होते. दरम्यान, असगोली फाट्याजवळच येताच त्यांच्या समोरून उसाने भरलेला ट्रॅकर संथ गतीने जात होता. संबंधित ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना दोघे उसाच्या ट्रॉलीला धडकले आणि रस्त्यावर पडले. याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने दोघांना चिरडले आहे.

Kolhapur Accident : ट्रक खाली येऊन दोन जिवलग मित्रांचे प्राण रस्त्यावरच गेले
ब्लॅकमेल..सेक्स अन् धोका, वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून लुटली अब्रु

या दुर्दैवी घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा या अपघाताची माहिती चंदगड पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. लांबचा प्रवास नसल्यामुळे संबंधित तरुणांनी हेल्मेट घातले नव्हते. हेल्मेट असते, तर तरुणांचे प्राण वाचले असते. कॉलेज मधील जवळच्या मित्रांवर काळाचा घाला गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धांदल उडाली आहे. मृत जयच्या मागे आई- वडील आणि भाऊ असा परिवार आहे. अजितच्या पश्चात आई- वडील आणि बहीण असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास चंदगड पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com