Bhandara: आईला भेटायला निघालेल्या नणंद-भावजयीला मृत्यूनं गाठलं, एकीचा हातच तुटला

सुरुची मल्लेवार यांना भंडारा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान सुरुची यांचा मृत्यु झाला.
Bhadara Accident
Bhadara Accidentअभिजित घेरमारे

भंडारा : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने स्कूटीवरुन जाणाऱ्या वहिनी-नणंदेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara District) साकोली तालुक्यातील मोहघाट जंगल परिसरातत घडली आहे. सुरुची रवींद्र मल्लेवार वय वर्ष 36 असं मृतक वहिनीचे नाव असून सोनाली आंगीडवार वय वर्ष 28 नणंदेचे नावं आहे. या दोघी आपल्या स्कूटीने घुटसावरी वरून साकोलीकडे येताना अज्ञात वाहनानी धडक दिल्यांने त्यांना जबर धडक दिली.

यामध्ये सुरूची मल्लेवार या मुलीचा खांदा पूर्णपणे तुटला असून दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागला आहे तर सोनाली संगीडवार यांच्या दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागल्याने त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये (Sakoli Sub-District Hospitals) भरती करण्यात आलं होतं.

Bhadara Accident
धक्कादायक प्रकार: मुंबईतील शाळेची बस 5 तासांपासून विद्यार्थ्यांसह बेपत्ता!

अतिशय गंभीर जखमी असल्याने सुरुची मल्लेवार यांना भंडारा सामान्य रुग्णालयात (Bhandara General Hospital) उपचारासाठी पाठविण्यात आले होते, मात्र उपचारा दरम्यान सुरुचि मलेवार यांच्या भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

तर येथे सोनाली आंगीडवार यांच्या साकोली येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. सुरुची मल्लेवार यांच्या आई गोंडउमरी PSC येथे आई नर्स असल्यामुळे त्यांना भेटायला दोन्ही मृतक जात होत्या. मात्र, मोहघाटा जंगलामध्ये झाडांची दोन्ही बाजूला कटाई सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे त्यामुळे एका अज्ञात भरधाव वाहनाने अचानक धड़क दिल्याने या दोघींचा मृत्यु झाला आहे. कोली पोलिस फरार वाहनाच्या शोध घेत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com