काळाने घातला घात! देवीच्या दर्शनासाठी नदीतुन जाणाऱ्या भावंडाचा दुर्दैवी मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहुन दोन भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाले आहे.
काळाने घातला घात! देवीच्या दर्शनासाठी नदीतुन जाणाऱ्या भावंडाचा दुर्दैवी मृत्यू
काळाने घातला घात! देवीच्या दर्शनासाठी नदीतुन जाणाऱ्या भावंडाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर : पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहुन दोन भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाले आहे. त्यापैंकी एकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. दुसरा भाऊ प्रदीप सुभाष डाके (वय- १४) वर्षे रा सुसरे हापाण्यात बुडुन मृत्यु पावला आहे.

हे देखील पहा-

सुसरे येथील प्रदीप सुभाष डाके आणि आदित्य सुभाष डाके हे दोन भाऊ देवीच्या मंदीराकडे जात होते. नदी ओलांडताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यावेळी आदित्य आणि प्रदीप पाण्यात वाहुन गेले आहेत. जवळच कपडे धुणा-या महिलांनी आरडा- ओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. गावातीलच केशव बर्डे यांनी नदीच्या पाण्यात बुडी घेवुन आदित्य सुभाष डाके याला पाण्याच्या बाहेर काढले आहे. आणि त्याचा जिव वाचविला.

काळाने घातला घात! देवीच्या दर्शनासाठी नदीतुन जाणाऱ्या भावंडाचा दुर्दैवी मृत्यू
Special Story : काळाने हिरावला कुटुंबाचा आधार; मुलांनाच जुंपले तिफणीला

मात्र, प्रदीप सुभाष डाके हा बुडालेल्या ठिकाणापासुन तिनशे ते चारशे फुट अंतरावर पाण्यावर तरंगतानाआढळुन आला. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले, असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले होते. या घटनेमुळे सुसरे गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com