रंगपंचमीची अनोखी परंपरा; कोणी बेशुद्ध होत नाही तोपर्यंत यात्रेत करतात दगडफेक

मुलांच्या मृत्यूला गदाजी महाराज कारणीभूत आहेत असा समज करून गावकऱ्यांनी आमची मुलं आम्हाला जिवंत करून घ्या अशी मागणी महाराजांकडे केली होती तेंव्हापासून...
रंगपंचमीची
रंगपंचमीची संजय राठोड

संजय राठोड -

यवतमाळ : विदर्भातील प्रसिद्ध गोटमार यात्रा म्हणुन यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) मारेगांव तालुक्यातील बोरी गदाजी येथे दरवर्षी होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी गोटमार यात्रा भरते. पण कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे ही यात्रा भरलीच नाही, मात्र यंदा ही यात्रा भव्य दिव्य भरली आहे.

एका अख्यायिके नुसार एकदा संत गदाजी महाराज हे गावात येत असताना महाराजांना मुलांनी आडविले आणि त्यांच्या वर दगडफेक केली. त्यानंतर महाराजांनी देखील मुलांना दगड मारला आणि त्यात मुलाचा मृत्यू झाला. तद्नंतर मुलांच्या मृत्यूला गदाजी महाराज कारणीभूत आहेत असा समज करून गावकऱ्यांनी आमची मुलं आम्हाला जिवंत करून घ्या अशी मागणी महाराजांकडे केली. मग संत गदाजी महाराजांनी मृत मुलांना दगड मारले आणि ती मुले जिवंत झाली. तेव्हापासून बोरी गदाजी येथे गोटमार यात्रा भरविल्या जाते असल्याचे गावकरी सांगताय.

रंगपंचमीची
'कंस, रावणाची आसुरी प्रतिज्ञा टिकली नाही, तिथे तुम क्या चिज हो शरदबाबू ?'

गावातील नागरिकांचा दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे राहून दगडफेकीचा खेळ सुरू करतात. एक गट स्लॅबच्या वरून दगडफेक करतो तर दुसरा गट खालून दगडफेक करतो. या दरम्यान तुफान गोटमार करतात पण आजपर्यंत यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पारंपरिक श्रद्धेनुसार या गोटमार प्रकारच्या यात्रेस (Gotmar Yatra) तो पर्यंत सुरू असते जो पर्यंत दोन्ही बाजूच्या कर्णधार ज्यास होळकर असे संबोधित केल्या जाते त्या पैकी एक बेशुद्ध होत नाही तो पर्यंत ही तुफान गोटमार यात्रा सुरूच असते.

ही यात्रा अंधश्रद्धा असल्याचे अनेकदा म्हटले गेले परंतु संत गदाजी महाराजांच्या अतूट श्रद्धेतून ही यात्रा सुरू आहे. दगड लागून जखमींना हा प्रसाद आहे असे मानल्या जाते. या दगडफेकीत चार जण जखमी झाले आहे. विज्ञानच्या युगात अशी जीवघेणा खेळ श्रध्देच्या नावावर कितपत योग्य आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com