Political News: शिंदे-फडणवीस सरकारवर या निकालाचा परिणाम होणार नाही; राज्याच्या माजी मंत्र्यांचे मत

"राज्य सरकारला कोणताही धोका नाही आणि शिंदे- फडणवीस सरकार स्थिर राहील"
Maharashtra Political Crisis, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Maharashtra Political Crisis, Devendra Fadnavis and Eknath ShindeSAAM TV

Mahadev Jankar News: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज बारामतीत एका खाजगी कार्यक्रमात आले होते. यावेळी माध्यमाशी संवाद साधताना महादेव जानकर यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भाष्य करताना जानकर म्हणाले की, शिंदे- फडवणीस सरकारकडे १८५ चा आकडा असून, यामध्ये जरी १६ आमदार अपात्र झाले, तरीही भाजपकडे बहुमत आहे. यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही आणि शिंदे- फडणवीस सरकार स्थिर राहील. (Latest Marathi News)

Maharashtra Political Crisis, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Chandrakant Khaire News: 'एकनाथ शिंदे जादूटोणा करतात, त्यांच्या तोंडात पांढरा खडा...' निकालाआधीचं चंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने (ED) नोटीस पाठवली आहे. त्यांना सोमवारी चौकशीला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना महादेव जानकर म्हणाले की, "दूध का दूध पाणी का पाणी होईल? जो स्वच्छ असेल त्याला काही भिण्याचं करण नाही. समोरील व्यक्ती जर चुकीची नसेल तर राज्यकर्त्यांना घाबरायचं कारण नाही आपण आपलं काम करत जायचं असतं".

Maharashtra Political Crisis, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Maharashtras Political Crisis : शिवसेनेच्या आमदारास Full Confidence म्हणाले निकालाची धास्ती आम्हांला नाही, बारामतीचे पिंगळे...

पुढे बोलताना जानकर म्हणाले की,"मी पक्ष काढलेला असून मी दुसऱ्या पक्षाचा गुलाम नाही, किंवा दलाल म्हणून फिरत नाही. मी राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष म्हणून फिरतोय. काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप यांच्यासोबत माझी मैत्री होऊ शकते. परंतु विलीन होऊ शकत नाही. मी जरी खासदार झालो हे भाजप (BJP) काँग्रेस यांच्या कुणाच्या जिवावर नाही. आम्ही कोणासोबतही युती करू शकतो. आज भाजप सोबत आहेत. पण भाजपला जर आमची गरज नाही वाटली तर आमचा मार्ग मोकळा होईल", असं देखील जानकर म्हणाले. (Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com