Video : ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’; पोलीस व्हॅनमधील गुंडाचा व्हिडीओ व्हायरल

नागपुरात गुंडांचं धाडस वाढतंय का?
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam Tv

Nagpur Crime News : नागपुरात (Nagpur) गुंडांचं धाडस वाढतंय का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारण आहे एका गुंडाने तयार केलेला एका व्हिडिओ. या गुंडाने चक्क पोलीस वाहनात एक व्हिडिओ शूट केला आहे. त्यात ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ असं म्हणत असल्याचे दिसून येत आहे. हे एक प्रकारे पोलिसांनाच (Nagpur Police) चॅलेंज आहे.

Nagpur Crime News
Pune Sextortion : अख्खं गाव चालवतंय सेक्सटॉर्शन रॅकेट; पुण्यातील प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन उघड

अच्छी इंदूरकर याला पोलिसांनी एका खुनाच्या आरोपात अटक केली आहे. साध्य तो कोठडीत आहे. न्यायालयात पेशी दरम्यान त्याला पोलीस वाहनात नेत असताना त्याचे दोन साथीदार पोलीस वाहनाबाहेर आले आणि त्यांनी व्हिडिओ तयार केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ क्लिपमध्ये काय आहे?

या व्हायरल व्हिडिओमध्ये गुंड ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ असं म्हणत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्या पोलीस व्हॅन मध्ये पोलीस बसले आहेत. इतकेच नाही तर त्याचे सहकारी त्याला 'खर्रा हवा का' असंही त्याचे विचारत असल्याचेच दिसत आहे. यावर तो 'सर्व आहे' असं म्हणतो.

त्यामुळं पोलिसांसमोर व्हिडिओ तयार करणे आणि पोलिसांना चॅलेंज करणे म्हणजे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न सध्या हा व्हिडिओ पाहून उपस्थित होत आहे. यानंतर पोलिसांच्या वाहनात बसून 'भांजे कुछ करना मत, आने के बाद ५० लाख की टीप है' असे म्हणतो. पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा दाखल केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com