'आपलं ईटकुर, हरित ईटकुर' हा उपक्रम ठरतोय आगळावेगळा

ईटकुर हे गाव झाडांचं गाव म्हणून पुढे येत आहे. गावातल्या प्रत्येक उंबरठ्या समोर एक झाड असून तुम्ही या गावाला भेट दिली तर तुम्हाला गावभर सगळीकडे झाडेच झाडे दिसतील.
'आपलं ईटकुर, हरित ईटकुर' हा उपक्रम ठरतोय आगळावेगळा
'आपलं ईटकुर, हरित ईटकुर' हा उपक्रम ठरतोय आगळावेगळाकैलास चौधरी

कैलास चौधरी

उस्मानाबाद जिल्ह्यातील ईटकुर (Usmanabad Itkur) गावाने एक आगळा वेगळा पॅटर्न राबवला आहे. मागील तीन वर्षांपासून 'आपलं इटकूर, हरित इटकूर' हा उपक्रम गावातील तरुणांनी सुरू केला असून हा उपक्रम सर्वांसाठीच आदर्शवत ठरेल असा आहे.

ईटकुर हे गाव झाडांचं गाव म्हणून पुढे येत आहे. गावातल्या प्रत्येक उंबरठ्या समोर एक झाड असून तुम्ही या गावाला भेट दिली तर तुम्हाला गावभर सगळीकडे झाडेच झाडे दिसतील. दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील हे चित्र सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे आहे. सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या यागावातील तरुणांनी पर्यावरणपूरक गाव बनविण्याचा संकल्प केला. आणि हरित ईटकुर या उपक्रमांतर्गत गावात वड, करंजा, लिंब, नारळ, बदाम, सप्तपर्णी आशा वेगवेगळ्या झाडांची लागवड केली.

'आपलं ईटकुर, हरित ईटकुर' हा उपक्रम ठरतोय आगळावेगळा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पडेल - दत्तात्रय भरणे

सुमारे अडीच हजार उंबरे असलेल्या या गावात 'उंबरठा तितकी झाड' आणि प्रत्येक चौकाचौकात झाड लावल्यामुळे जिल्हाभरात या गावाची ओळख 'झाडांचं गाव' म्हणून होत आहे. लागवडीप्रमाणेच या गावाने या झाडांच्या संवर्धनावर विशेष लक्ष दिलं आहे. गावकऱ्यांनी प्रत्येक वृक्ष दत्तक घेत त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली असून पाणी देण्यासाठी पाण्याच्या पंगती ठरविण्यात आल्या आहेत. यासह झाडांच्या संगोपनासाठी त्याची आळी बनवणे, छाटणी करणे, आधार टेकू देणे यावर श्रमदान करून विशेष लक्ष दिले जाते आहे. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणी झाड तोडल्यास पैश्या स्वरूपात दंड देखील वसूल केला जात आहे.

संगोपना सोबतच झाडांना जगविण्याची शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे'हरित गाव' करण्याचा केलेला हा संकल्प नक्कीच प्रशंसनीय आहे त्यामुळे या उपक्रमाचे अनुकरण राज्यातील इतर गावांनी देखील करायला हरकत नाही.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com