Talvat Dam News : रामभरोसे असलेल्या तळवट धरणाचे दरवाजे बंद होणार; पाटबंदारे विभागाला मोठं यश

खासगी कंपनीच्या मदतीने धारणावरील वेल्डिंगचे काम पूर्ण करून घेत धरणाचा उघडलेला दरवाजा बंद केला आहे.
Talvat Dam News
Talvat Dam Newsजितेश कोळी, रत्नागिरी खेड

Talvat Dam News: रत्नागिरीमधील ( Ratnagiri ) खेड तालूक्यात असलेल्या तळवट धरणासंदर्भात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या आठड्यापासून धरणाचे वक्राकार दरवाजे अज्ञातांनी उघडले होते. त्यामुळे ते पुन्हा बंद करण्याचे मोठे आवाहन पाटबंधारे विभागासमोर उभे राहिले. अशात अनेक प्रयत्नांनंतर हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रविवारी दुपारी काही प्रमाणात उघडलेले दरवाजे बंद करण्यात यश आल्याने पाटबंदारे विभाग आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गेल्या आठवड्यात या धरणाचे वक्राकार दरवाजे काही अज्ञातांनी खुले केले होते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे पाणीसाठा देखील भरपूर प्रमाणात कमी झाला. धरणाचे (Dam) दरवाजे बंद करण्यासाठी पाटबंधारे विभाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र काही तांत्रीक अडचणींमुळे हे काम पू्र्ण होत नव्हते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एका खासगी कंपनीच्या मदतीने धारणावरील वेल्डिंगचे काम पूर्ण करून घेत धरणाचा उघडलेला दरवाजा बंद केला आहे.

Talvat Dam News
धक्कादायक! तळवट धरणाचे दरवाजे अज्ञातानं उघडले; लाखो लिटर पाणी वाया, धरणाची सुरक्षा रामभरोसे...

धरणावर एकही सुरक्षा रक्षक नव्हता

ही घटना घडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या धरणावर एकही सुरक्षा रक्षक नव्हाता. मुळात या धरणासाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अज्ञातांनी धरणाचे दरवाचे उघडले. अशात आता तरी पाटबंधारे विभागाचे डोळे उघडतील आणि धरणावर सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली जाईल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Talvat Dam News
नळगंगा धरण प्रकल्पावर अधिकाऱ्याची परिवारासह सैर; दुर्घटना घडल्यास जवाबदारी कुणाची...?

धरणाचे दरवाजे अज्ञातांनी खुले केल्यावर खेड पोलीस स्थानकात याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेत अज्ञांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. त्यांचा शोध अद्याप लागलेला नसला तरी धरणाचे दरवाजे बंद करण्यात यश आले आहे. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक धरणासाठी सुरक्षा रक्षक किती गरजेचे आहेत हे स्पष्ट झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com