Bus Accident : थरारक! धावत्या एसटीचे चाक निखळले; बसची अवस्था पाहून थक्क व्हाल... (पाहा Video)

नगझिरी फाट्यावरील घटना घटना
Bus Accident
Bus Accident Saam Tv

अमर घटारे

Amravati Accident News : चालत्या बसचे टायर निखळल्याची थरारक घटना अमरावतीत घडली आहे. बसचे टायर निखळल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखल्यामुळे गाडीतील १५ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. नागझरी फाट्याजवळचा ही घटना घडली आहे. ही घटना रविवारी साडेसहा वाजता घडली. 

Bus Accident
Accident Video : भरधाव कार डिव्हाडरला धडकून हवेत उडाली; समोरुन येणाऱ्या कारवर आपटली, पाहा व्हिडीओ

अमरावतीत (Amravati) चालत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याची धक्कदायक घटना घडली आहे. मोर्शी वरून वरूडकडे जाणाऱ्या एसटीचा (ST) थरारक अपघात झाला आहे. या बसमध्ये प्रवास करीत असलेले १५ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

Bus Accident
Akola Crime : अकोल्यात खळबळ! १३ वर्षीय मुलीला म्हणाला, चल तुला घरी सोडतो...पुढे घडले ते धक्कादायक

चालकाने प्रसंगावधान दाखवून वेळीच बस थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मागील चाकाचे एक्सल तुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. मात्र चालकाच्या सतर्कतेने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com