नाला ओलांडताना वाहून गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह सापडला

पुरात नाला ओलांडत असताना तीन महिला वाहून गेल्या होत्या त्या तीन पैकी दोघी बचावल्या
नाला ओलांडताना वाहून गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह सापडला
नाला ओलांडताना वाहून गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह सापडलाSaam Tv

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana district) झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काल सायंकाळी आलेल्या पुरात नाला ओलांडत असताना तीन महिला वाहून गेल्या होत्या त्या तीन पैकी दोघी बचावल्या होत्या, मात्र एक महिला वाहून गेली होती ती बेपत्ता झाली होती त्या बेपत्ता महिलेचा मृतदेह (Dead body) आज सापडला आहे.(The woman's body was found)

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहराजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुरात नाला ओलांडताना तीन महिला वाहून गेल्याची घटना घडली होती, मात्र यावेळी दोन महिलांना वाचविण्यात यश आले होते तर एक महिला वाहून गेल्याची गटना काल सायंकाळी 5 च्या सुमारास घडली होती. वाहून गेलेल्या त्या महिलेच नाव मंगला शिंगणे असं आहे दरम्यान शिंगणे यांचा कालच सर्वत्र शोध घेतला जात होता मात्र पडणारा पाऊस आणि अंधार असल्याने शोधकार्यात अडथळा येत होता आणि त्यामुळे त्यांचा शोध घेण्यास अडथळा येत होता आणि त्यामुळे त्यांचा शोध लागलाच नाही.

नाला ओलांडताना वाहून गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह सापडला
Crime : प्रेमसिंग गिरासे हत्या प्रकरण, मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर

मात्र आज या महिलेचा मृतदेह नाल्यात अडकलेल्या अवस्थेत सापडला आहे त्यामुळे सिंदखेडराजा शहरात खळबळ उडाली असून मृत मंगला शिंगणे या 40 वर्ष आहे कामावरून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली होती या घटनेने मा६ सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com