
बुलडाणा : लग्नाच्या (Marriage) गाठी या नशिबाने बांधल्या जातात असं म्हटलं जातं. मात्र, ही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसतं. काही नवविवाहीत महिलांच्या नवऱ्याचा अकाली मृत्यू झाला तर त्यांच्या नशिबी आयुष्यभराचा वनवास येतो. अशाच एका महिलेचा संसार पतीच्या अकाली निधनाने मोडला होता. मात्र, दिराने घेतलेल्या निर्णयामुळे विधवा (Widow) वहिनीचा संसार आता नव्या सुरु झाला आहे. संग्रामपूर तालुक्यातील (Sangrampur taluka) वानखेड या छोट्याशा गावात बदलत्या काळानुसार विचार करून, एका विधवेचं लहान दिरासोबत लग्न लावून दिल्याची कौतुकास्पद घटना समोर आली असून या विवाहाचे सर्वत्र कौतुक केलं जातय. (Buldhana Latest Marathi News)
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावातील रामदास दामधर यांच्या मुलाचा आदर्श विवाह आज पार पडला. वानखेड गाव येथील गुरूदेव मंडळांचे सेवेकरी श्री रामदास दामधर यांच्या मोठ्या मुलाचं काही दिवसांपुर्वी आजाराने निधन झालं होतं. या मुलाच्या निधनामुळे त्याची पत्नी आणि २ लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून आपल्या सुनेचा विवाह दोन नबंरचा मुलगा हरीदास याच्याशी लग्न लावुन देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुन सुनंदा ही पुन्हा एकदा सुवासिन झाली आहे.
रामदास दामधर त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. एका तरुणानं समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत एका विधवा महिलेशी विवाह केला. त्याने संबंधित महिलेला आयुष्यभराचा आधार दिल्याने आणि एक धाडसी पाऊल उचलल्यामुळे संबंधित तरुणाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
महिलेच्या पतीनं अशी अचानक साथ सोडल्यानं संबंधित महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आता पुढील आयुष्य जगायचं कसं, दोन लहान मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न विधवा महिलेसमोर होता. अशातच घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी सर्व विचार करून आपल्या लहान मुलांचा विवाह त्याच्या मोठ्या वहिनीसोबत लावून देण्याचा निर्णय सर्वानुमते घेऊन प्रत्यक्षात लग्न लावून दिलं. दामधर कुटुंबाने घेतलेला निर्णय योग्य असल्याने ग्रामस्थानी कौतुकच केलंच शिवाय हा आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा असं आवाहन ग्रामस्थांनी केलं आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.