सेल्फीच्या नादात युवक गेला वाहून

एक युवक सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून, वर्धा नदीच्या पात्रात पडून वाहत गेल्याची घटना
सेल्फीच्या नादात युवक गेला वाहून
सेल्फीच्या नादात युवक गेला वाहूनअरुण जोशी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण बघण्यासाठी कुटुंबासमवेत आलेला एक युवक सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून, वर्धा नदीच्या पात्रात पडून वाहत गेल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मोर्शीपासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून मानले, जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या १३ दरवाजांपैकी ७ दरवाजे ६५ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे.

हे देखील पहा-

त्यामधून ७३७ दलघमी प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अप्पर वर्धा धरणाची निर्धारित लेव्हल ही ३४२.५० असून, सध्याची लेव्हल ३४२. ४० इतकी आहे. परिणामी धरण ९८.३० टक्के भरले असल्याने वर्धा नदीच्या प्रवाहात ७ दरवाजातून पाणी सोडले जात आहे. हे निसर्गरम्य धरण बघण्यासाठी आणि पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

सेल्फीच्या नादात युवक गेला वाहून
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; धनंजय मुंडेंनी केलं हुतात्म्यांना अभिवादन

चांदुरबाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील कुटुंब आपल्या वाहनाने धरण बघण्यासाठी आले होते. धरण बघण्याचा आनंद घेत असताना, वर्धेकडे जाणाऱ्या पुलावरून फोटो घेत असतांना प्रफुल्ल अशोक वाकोडे वय (वय- 40) हा युवक नदीपात्रात पडून वाहत गेला आहे. या युवकासोबत ३ महिला व ४-५ मुले असल्याचे समजते.

या घटनेची माहिती तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना मिळताच, त्यांनी तात्काळ जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन शोध पथकाला याठिकाणी पाचारण करण्यात आले आहे. मात्र, अंधारामुळे रात्री शोध मोहिम झाली नाही. आज सकाळ पासून शोध मोहीम कामास सुरूवात करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com