नागपुरात नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी; 50 तोळे सोन्यासह तिजोरीच पळविली

नगरसेवक व जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली करुन ५० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
नागपुरात नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी; 50 तोळे सोन्यासह तिजोरीच पळविली
नागपुरात नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी; 50 तोळे सोन्यासह तिजोरीच पळविलीSaam TV

नागपूर: नगरसेवक व जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली करुन ५० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवई यांचा सेमिनरी हिल्समध्ये मालाबार कॉलनीत प्रशस्त बंगला आहे. बंगल्यात गेल्या काही दिवसांपासून स्विमिंग पूलचे काम सुरू आहे. त्यांच्याकडे नोकरही आहेत. संदीप गवईंच्या कुटुंबीयांचा कपड्याचा व्यवसाय आहे. १७ ऑक्टोबरला गवई कुटुंबीयांसह मुंबईला खरेदीसाठी गेले होते.

शनिवारी गवई नागपुरमध्ये परत आले. आज रविवारी दुपारच्या सुमारास त्यांनी बेडरुममधील लॉकर उघडले असता. त्यातील तिजोरी त्यांना गायब दिसली. त्यात पन्नास लाख रुपयाचे सोने, रोख रक्कम आणि मौल्यवान साहित्य होते. मात्र, चोरट्यांनी केवळ सोन्यावर डल्ला मारल्याची माहिती त्यांनी दिली. गवईंनी घटनेची तक्रार गिट्टीखदान पोलिसांना फोनवरुन दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बंगल्याची तपासणी केली. त्यावेळी घरातील कोणतेही साहित्याला हात न लावल्याचे दिसले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com