लातूरच्या मधुबन सुपर मार्केट मध्ये चोरी करणारा भामटा अटकेत

मधुबन सुपर मार्केट मध्ये दिनांक 17 जून रोजी चोरट्यांनी दुकानाची खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश करून चोरी केली होती.
लातूरच्या मधुबन सुपर मार्केट मध्ये चोरी करणारा भामटा अटकेत
लातूरच्या मधुबन सुपर मार्केट मध्ये चोरी करणारा भामटा अटकेत दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर मधील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या औसा रोड वरील मधुबन सुपर मार्केट मध्ये दिनांक 17 जून रोजी चोरट्यांनी दुकानाची खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश करून चोरी केली होती. Theft in Latur's Madhuban supermarket.

हे देखील पहा -

या चोरीत त्यांनी दुकानातील रोख रक्कम चोरून नेली होती. मधुबन सुपर मार्केट चे मालक यश ब्रिजवाशी यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लातूरच्या मधुबन सुपर मार्केट मध्ये चोरी करणारा भामटा अटकेत
रायगड जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बार राहणार खुले; मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण

चोरट्यांनी फोडलेल्या दुकानाची पाहणी करून त्या दुकानाचे सीसीटीव्ही फूटेज शिवाजीनगर पोलिसांनी हस्तगत केले. यामध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मोबाईल स्क्रीन सेव्हर वरून पांडुरंग शिंगडे, यास विचारपूस केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेली चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम आरोपीकडून ताब्यात घेण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com