प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरात मोठी चोरी; सोना चांदीसह लाखो रूपये लंपास

एकूण 6 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे
प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरात मोठी चोरी; सोना चांदीसह लाखो रूपये लंपास
प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरात मोठी चोरी; सोना चांदीसह लाखो रूपये लंपासSaam Tv

नंदुरबार - नवापूर Navapur शहरातील शितल सोसायटीतील येथील एक कुटुंब लग्नासाठी गेले होते. चोरट्यांनी Theft घरातील मागच्या बाजूच्या खिडकीची ग्रील तोडून बंद घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे Gold दागिने, सिक्के, हिऱ्यांच्या हार, जुने पारंपारिक दागिने,एक लाख 73 हजार रुपये रोख रकमेसह एकूण 6 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

हे देखील पहा -

या चोरीने नवापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरवस्तीच्या या घरात झालेल्या चोरीमुळे नवापूर पोलिसांना चोरट्यानी मोठे आव्हान दिले आहे. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरीत आहे. नवापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी विजय प्रभातीलाल अग्रवाल वय 54 हे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी दमण येथे घराला कुलूप लावून गेले होते. घरात चोरी झाल्याची माहिती त्यांचे नोकर यांनी दिली.

प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरात मोठी चोरी; सोना चांदीसह लाखो रूपये लंपास
डोंबिवलीत पार पडला मनसे वाहतूक सेलचा संवाद मेळावा...

घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाटातील पोत, सोन्याची अंगठी, सोन्याची चेन, मंगळसूत्र, सोन्या चांदीचे शिक्के, हिऱ्यांचा हार, पारंपारिक दागिने एक लाख 73 हजार रुपये रोख असा एकूण 6 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी नवापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com