Shree Ram Temple : श्रीराम मंदिरात चाेरी; चांदीच्या पादुकांसह दानपेटीवर डल्ला

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.
Nagar
Nagarsaam tv

- सुशील थोरात

Nagar Crime News : नगर (nagar) तालुक्यातील वाळकी येथील श्रीराम मंदिरातून चोरट्यांनी चांदीच्या दोन पादुका आणि मंदिरातील दानपेटी पळवली आहे. लांबविली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. वाळकी येथील श्रीराम मंदिर शेजारी चहुबाजूंनी लोकवस्ती आहे. येथे भाविकांची मोठी वर्दळ देखील असते. (Breaking Marathi News)

Nagar
पुण्याचा अभिजीत कटके ठरला 'हिंद केसरी', हरियाणाच्या पैलवानाला केलं चितपट

याच मंदिरात चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या मंदिरातील श्रीराम (ram) आणि अन्य देवतांची पूजाअर्चा करण्यासाठी सकाळी सात वाजता सचिन बाबासाहेब भालसिंग गेले. त्यावेळी त्यांना मंदिराचा (temple) दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना प्रकार लक्षात आला.

Nagar
Pune : CBSE बोगस शाळा प्रकरणी आज चौकशी होणार ; पाहा सविस्तर बातमी

भालसिंग यांनी मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन पाहिले असता, साधारण दोन किलो वजनाच्या चांदीच्या दोन पादुका आणि दानपेटी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर त्यांनी पोलिसांना (police) चोरी संदर्भात माहिती दिली. वाळकी येथील श्रीराम मंदिर शेजारी चहुबाजूंनी लोकवस्ती आहे. येथे भाविकांची मोठी वर्दळ देखील असते. त्यामुळे चाेरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com