वन कर्मचाऱ्यांकडूनच मारहाण; खोटा गुन्हा दाखल! ठेलारी संघटना आक्रमक

तालुक्यातील बुरजड या गावातील ठेलारी बांधव लहू ठेलारी यांनी दैनंदिन नित्य नियमाप्रमाणे सहा जुलै रोजी आपली सर्व जनावरे घेऊन चारण्यासाठी रानात गेले असता, त्या ठिकाणी वन हवालदार नितीन सांगळे व त्यांच्या चार साथीदार कर्मचाऱ्यांनी लहू ठेलारी यास मेंढ्याचारणावरून जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वन कर्मचाऱ्यांकडूनच मारहाण; खोटा गुन्हा दाखल! ठेलारी संघटना आक्रमक
वन कर्मचाऱ्यांकडूनच मारहाण; खोटा गुन्हा दाखल! ठेलारी संघटना आक्रमक भूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे : तालुक्यातील बुरजड या गावातील ठेलारी बांधव लहू ठेलारी यांनी दैनंदिन नित्य नियमाप्रमाणे सहा जुलै रोजी आपली सर्व जनावरे घेऊन चारण्यासाठी रानात गेले असता, त्या ठिकाणी वन हवालदार नितीन सांगळे व त्यांच्या चार साथीदार कर्मचाऱ्यांनी लहू ठेलारी यास मेंढ्याचारणावरून जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत लघु ठेलारी यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधित हवालदार नितीन सांगळे यांनी लहू तेलारी यास मारहाण Beating करण्यास सुरुवात केली. Thelari organization is aggressive due to beating by forest workers

त्यानंतर लहू ठेलारी यास वन कर्मचाऱ्यांकडून मारहाण होत असल्याचे बघताच लहू ठेलारी यांचे सहकारी तात्काळ हे भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागले. परंतु वन कर्मचारी यांनी सर्वांनी एकत्र येत ठेलारी बांधवांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये जबर जखमी झालेल्या लहू ठेलारी यास त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ तेथून पळवून नेत सोनगीर रुग्णालयात दाखल केले. परंतु मारहाण जबर असल्यामुळे त्यांना रुग्णालय प्रशासनातर्फे धुळे Dhule येथे रेफर करण्यात आले.

शासकीय रुग्णालय मध्ये उपचारात दिरंगाई होत असल्यामुळे लहू ठेलारी यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. वन कर्मचाऱ्यांनी लघु ठेलारी यास जबर मारहाण करून स्वतःच सोनगीर पोलीस ठाण्यामध्ये खोटी फिर्याद देऊन लहू ठेलारी यांनी सरकारी कामात अडथळा करत मारहाण केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन कर्मचाऱ्यांकडूनच मारहाण; खोटा गुन्हा दाखल! ठेलारी संघटना आक्रमक
मॅट्रिमोनी साईट वरून वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक !

या विरोधामध्ये महाराष्ट्र ठेलारी महासंघ तर्फे वन विभागाच्या Forest Department वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत आज निवेदन देण्यात आले असून, तात्काळ खोटे गुन्हे मागे घ्यावेत व दोषी असलेल्या वन हवालदार नितीन सांगळे व त्यांच्या सोबत असलेल्या वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी ठेलारी संघटनेतर्फे करण्यात निवेदनामार्फत आली आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com