
औरंगाबाद : उंदराने झेरॉक्स मशीनची केबल खाल्ल्याने दोन्ही सत्रांच्या परीक्षेला दोन तासांचा उशीर झाल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत सलग पाचव्या दिवशीही गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ मानवनिर्मित नव्हता तर उंदराने निर्माण केला होता. उंदराच्या प्रतापाने विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप झाल्याचा प्रत्यय समोर आला आहे. (Latest Marathi News)
औरंगाबाद (Aurangabad) शहरातील भडकल गेटच्या रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन्समधील झेरॉक्सची केबलच उंदराने खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अडीज किमी अंतरावरील मौलाना आझाद कॉलेजमधून प्रश्नपत्रिकांसाठी प्रिंट आणाव्या लागल्या. यामुळे सकाळच्या सत्रात दीड ते दोन तासांचा उशीर झाला.
त्याचबरोबर दुपारचा पेपरही दोन तास उशिराने सुरू झाला. दोन्ही सत्रांतील एमए, एमएस्सीच्या १६०५ विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत (Exam) सलग पाचव्या दिवशीही गोंधळ कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ओळखपत्रावरून परीक्षा केंद्रात प्रवेश घेत परीक्षा द्यावी लागली होती. विद्यापीठाच्या परीक्षेत सातत्याने गोंधळ समोर येत आहे. त्यामुळे सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
दरम्यान, हॉलतिकीट न मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आम्ही हॉलतिकीट परीक्षेच्या एक दिवस अगोदरच महाविद्यालयांना पाठवले. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले नाही, असे त्यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.