गायीला बसायला गादी! विदर्भातील भक्त गावाने बांधलंय गो मंदिर

सार्शी गावातील लोक गायीला बसण्यासाठी गादी ठेवतात.
सार्शी गावातील लोक गायीला बसण्यासाठी गादी ठेवतात.

अमरावती ः गायीला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. वसुबारसेला गोमातेची पूजाही केली जाते. नंतर मात्र, तिची हेळसांड होते. काही जण गायी कसायालाही विकतात. असे विदारक चित्र असले तरी विदर्भातील एका गावात चक्क गायीचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या सप्ताहास किमान २५ हजार भाविक उपस्थित असतात. विशेष म्हणजे या मंदिराला तब्बल ३०० वर्षांची परंपरा आहे.

माणसाने मुक्या प्राण्यांना जितका प्रेम दिलं, त्याच्या कितीतरी पटीने मुके प्राणी माणसाला प्रेम देतात. त्यामुळेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांनी आपल्या कीर्तनात व दशसूत्रीत म्हटलेच आहे, मुक्या प्राण्यांना दया करा. एका अभंगात तुकोबांनी देवाच्या नावाने दिले जाणारे बळी यावर आसूड ओढले आहेत. There is a cow temple in Sakri village in Vidarbha

सार्शी गावातील लोक गायीला बसण्यासाठी गादी ठेवतात.
टिपू सुलतान नामांतर वाद, गोवंडीत भाजप-सेनेत सोशल वॉर

अमूक अमूक देवाला प्राण्यांचा बळी हवा असतो, असे काही लोक म्हणतात आणि मांसावर ताव मारतात. अशा तामसी भक्तांना व त्यांच्या तामसी देवतांना तुकोबांनी फटकारले आहे. साधु-संतांनी मुक्या प्राण्यांशी प्रेम करावे, असे लिहून ठेवलं असतानासुद्धा आज ही मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होते. मात्र, तिवसा तालुक्यातील सार्शी या गावात अनेक वर्षांपासून गायीला पूजण्याची परंपरा आहे.

गायीची साजरी होते पुण्यतिथी

पार्वती माता संस्थान, सार्शी या ठिकाणी गावाच्या अगदी मध्यभागी गायीचे मंदिर आहे. येथे जिल्ह्यातून अनेक जण दर्शनासाठी येत असतात. येथील ग्रामस्थ या मंदिराविषयी अनेक कथा सांगतात. गावातील पशुधन याच गायीपासून जन्मले आहे. त्यांची पूजा तसेच व्यवस्था ग्रामस्थांकडून केली जाते. सार्शी या गावाची लोकसंख्या दीड हजार आहे. प्रत्येक घरात गायीची प्रतिमा पहायला मिळते. एवढेच नाही तर पौष पौर्णिमेला मंदिरात पुण्यतिथी भागवत सप्ताहाचे आयोजन मोठ्या उल्हासाने केले जाते. या कार्यक्रमाला जवळपास पंचवीस ते तीस हजार भाविक उपस्थित असतात.

गायींना बसण्यासाठी गावकरी देतात गादी

एका गायीपासून झालेली वंशवाढ आज दहा गायींपर्यंत येऊन पोचली आहे. तर यातील सहा गायी दगावल्या आहेत. त्यांना मंदिराला लागूनच समाधी देण्यात आली. तर चार गाई या गावात वास्तव्याला आहेत. गावातील प्रत्येक जण गायीची विशेष काळजी घेतो. त्यांना बसण्याकरिता गादीचे आसन दान करतात. तसेच मोकाट जनावरे व कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांकरिता गौरक्षण तयार करण्यात आले आहे.There is a cow temple in Sakri village in Vidarbha

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com