सैनिक बँकेचा सभासदांसाठी लढा, अध्यक्षांचे स्पष्टीकरण

सैनिक बँकेचा सभासदांसाठी लढा, अध्यक्षांचे स्पष्टीकरण
पारनेर सैनिक बँकgoogle

अहमदनगर ः गुन्हेगारी व खंडणीखोर प्रवृत्तीच्या लोकांनीच सैनिक सहकारी बँकेविरोधात तक्रारी केल्या आहेत. बँकेच्या 73 कोटी रूपयांच्या ठेवी 133 कोटी रूपयांवर गेल्या आहेत. संचालक आणि सभासदांचा विश्वास असल्याचेच हे द्योतक आहे. जे तक्रारी करतात, त्यांचा बँकशी कसलाच संबंध नाही, असा आरोप बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांनी केला आहे.

पत्रकार परिषद घेऊन बँकेवरील आरोपांचे खंडण केले. निवडणूक जवळ आल्याने जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. परंतु असल्या बदनामीने आम्ही विचलित होणार नाही, असेही ते प्रसिद्धी पत्रकात म्हणतात.There is no corruption in Sainik Bank

पारनेर सैनिक बँक
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

अरूण रोडे यांचा बँकेशी काहीच संबंध नाही. ते बँकेचे खातेदार,ठेवीदार, सभासद, कर्जदार किंवा कोणत्याही कर्जदारास जामीनसुध्दा नाहीत. तहसीलदारांकडून खंडणीप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. बँकेविषयी त्याने आतापर्यंत 39 तक्रारी केल्या आहेत.

विनायक गोस्वामी हे बँकेचे सेवक होते. त्यांच्याकडून पैशाचा अपहार झाल्याने ते बँकेत आले नाहीत. त्यामुळे त्यांना सेवेतून कमी केले. मागील निवडणुकही ते पराभूत झाल्याने व आता निवडणूक आल्याने त्यांचा तक्रारींचा उद्योग सुरू झाला आहे.

वैभव पाचारणे यांच्यावरसुद्दा पारनेर पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार यांना धक्काबुक्की केल्याचा गुन्हा आहे. कोळगाव (ता.श्रीगोंदे ) येथील भरत हटावकर यांनी कर्जाची परतफेड केली. त्या नंतर त्यांच्या नावावरील जमीन त्यांचे चुलत बंधू यांना स्वतः विकली. मात्र, तेसुद्धा बँकेविरूध्द खोटे तक्रार अर्ज करीत आहेत. आम्ही बँकेला संकटातून बाहेर काढले. या असल्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन उपाध्यक्ष शिवाजी सुकाळे यांनी केलेय. संचालक संजय तरटे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, भास्कर पोपळघट, वसुली अधिकारी संतोष भनगडे पत्रकार परिषदेस उपस्थित होते.There is no corruption in Sainik Bank

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com